---Advertisement---

T20 World Cup 2022: जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट मिळाली! ‘तो’ खेळाडू होणार ऑस्ट्रेलियाला रवाणा

India-T20
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून पुरूष क्रिकेट संघांचा टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी असून तो 23 ऑक्टोबरला मेलबर्न येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने सरावास सुरूवात केली आहे. पर्थ येथे भारत दोन अभ्यास सामने खेळणार आहे, मात्र भारताला काही दिवसांपूर्वी मोठा झटका लागला. मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी20 विश्वचषकातून बाहेर झाला. आता त्याची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्याचे उत्तर आता सापडले आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद शमी (Mohammed Shami) टी20 विश्वचषकात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची जागा घेऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार शमी पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाणा होऊ शकतो. बुमराहच्या अनुपस्थितीत उमरान मलिक किंवा मोहम्मद सिराज त्याची जागा घेणार अशा चर्चांना उधान आले होते. मात्र रिपोर्ट्सनुसार शमी हाच त्याचा रिप्लेसमेंट प्लेयर असणार आहे, असे वृत्त पुढे येत आहे.

भारत पाकिस्तानशी भिडण्यापूर्वी पर्थ येथील स्थानिक संघाविरुद्ध दोन अभ्यास सामने आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध सराव सामने खेळणार आहेत. अभ्यास सामने 10 आणि 13 ऑक्टोबरला खेळले जाणार आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 ऑक्टोबर आणि न्यूझीलंडविरुद्ध 19 ऑक्टोबरला सराव सामने खेळणार आहेत.

भारत ऑस्ट्रेलियाला 14 मुख्य सदस्यांसोबत गेला. त्यामध्ये रोहितसह विराट कोहली, दीपक हुड्डा आणि आर अश्विनसह इतर खेळाडू होते. संघ आणि स्टाफचा फोटो बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवर शेयर केला आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा टी20 मालिकांमध्ये पराभव केला आहे. त्यातच भारत घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मागील काही टी20 मालिकांमध्ये जिंकला असून संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. असे असताना भारताला गोलंदाजांच्या कामगिरीची चिंता सतावत आहे, अशात भारत टी20 विश्वचषकात कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यासंह सर्वांचे लक्ष असणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी लीगमध्ये सलामीच्या लढतीत दबंग दिल्लीची धडाकेबाज सुरुवात, यु मुंबावर सहज मात
गोष्ट एका क्रिकेटरची: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---