टी20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. या स्पर्धेआधीच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या गंभीर दुखापतीचा शिकार झाला आहे. यामुळेच तो ऑस्ट्रेलियाला जाताना भारतीय संघासोबत जाणार नाही. भारत टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाणा होणार आहे. अशी स्थिती असताना बीसीसीआयने तो विश्वचषकापूर्वी फिट होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची बॅक स्ट्रेस फ्रॅक्चर ही दुखापत गंभीर असून तो विश्वचषकात खेळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला. याचे स्पष्टीकरण देताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाले, “सध्यातरी बुमराह टी20 विश्वचषकातून बाहेर झालेला नाही. विश्वचषक सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस शिल्लक आहेत. आपण काही काळ थांबावे. घाईत काहीतरी वक्तव्य करणे चुकीचे ठरेल.”
बुमराहची दुखापत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यातून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला चार ते सहा महिने लागतील असे बोलले जात आहे.
वृत्तसंस्थेच्या रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, बुमराहच्या विविध चाचण्या झाल्या असून त्याचे स्कॅनही करण्यात आले आहेत. यामुळे तो भारतासोबत ऑस्ट्रेलियासाठी प्रवास करणार नाही. जर तो पूर्णपणे फिट असेल तो नंतर ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.
बुमराहने जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यानंतर थोड्या दिवसाचा ब्रेक घेतला होता. ब्रेकनंतर तो आशिया चषकात खेळणार होता, मात्र त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोके वर काढल्याने तो त्या महत्वाच्या स्पर्धेसही मुकला होता. त्याने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेतून संघात पुनरागमन केले. त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात गोलंदाजी केली. तसेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतही भारतीय संघात होता, मात्र पहिल्याच सामन्यात पुन्हा त्याने पाठीच्या दुखापतीने सामन्यातून माघार घेतली.
आशिया चषकात बुमराह खेळला नाही यामुळे भारत अंतिम सामन्यात पोहोचला नाही, तर ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी पूरक ठरतात, असे असताना त्याचे संघात असणे भारतासाठी महत्वाचे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CPL FINAL 2022: सहा वर्षानंतर जमैका चॅम्पियन, बार्बाडोसचा पराभव करत तिसऱ्यांदा कोरले चषकावर नाव
T20 World Cup 2022: टीम इंडियामध्ये दोन बदल! वेगवान गोलंदाजांची संघामध्ये एंट्री






