टी20 विश्वचषक 2022मध्ये अनेक संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. त्या संघांमध्ये न्यूझीलंड या बलाढ्य संघाचाही समावेश आहे. न्यूझीलंडने शनिवारी (दि. 29 ऑक्टोबर) सिडनीच्या मैदानावर श्रीलंकेवर 65 धावांनी सोपा विजय मिळवला. तसेच, उपांत्य सामन्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. या विजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा संघाच्या प्रदर्शनावर भलताच खुश दिसला. त्याने खेळाडूंचे गुणगानही गायले. चला तर जाणून घेऊया, विलियम्सन नेमकं काय म्हणालाय.
विलियम्सनचे वक्तव्य
सामना जिंकल्यानंतर केन विलियम्सन (Kane Williamson) म्हणाला की, “हा सामना शानदार होता. खेळपट्टी वेगळी होती आणि पीचवर टेनिस चेंडूप्रमाणे उसळी होती, त्यामुळे इथे संथ गतीचे आणि वेगवान चेंडू प्रभावी होते.” त्याने ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याचे शतक अतुलनीय असल्याचे सांगत म्हटले की, “कोणतेही शतक शानदारच असते. त्याने आमच्या खराब सुरुवातीनंतर विरोधी संघावर दबाव निर्माण केला आणि चांगली मेहनत घेतली. आम्ही आक्रमक होतो, पण पॉवरप्लेमध्ये लेंथ चेंडूला हिट करणे सर्वात कठीण होते. त्यामुळे आम्ही त्याच चेंडूंवर टिकून राहिलो. खेळाडूंनी योजना योग्यरीत्या अंमलात आणल्या.”
Points in the bank! Trent Boult leads the bowling effort with 4-13 at the @scg to defend against @OfficialSLC. Wickets also for Santner, Sodhi, Southee and Ferguson. Card | https://t.co/evB7YxqHcD #T20WorldCup pic.twitter.com/pFnJPFzFK6
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 29, 2022
सामन्याचा आढावा
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाला खराब सुरुवातीचा सामना करावा लागला. त्यांच्यावर 15 धावांवर 3 विकेट्स गमावण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र, फिलिप्स याने न्यूझीलंडचा डाव सांभाळला आणि शानदार फलंदाजी प्रदर्शनाने शतक झळकावले. त्याने 64 चेंडूत 104 धावा चोपल्या. यामध्ये 4 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. न्यूझीलंड संघाने 7 विकेट्स गमावत 167 धावा चोपल्या होत्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाची गाडी सुरुवातीलाच रुळावरून खाली घसरली, ती शेवटपर्यंत रुळावर आलीच नाही. संपूर्ण संघ 102 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंका संघाकडून फक्त दसून शनाका (35) आणि भानुका राजपक्षे (34) या दोन फलंदाजांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली. मात्र, ते संघाला सामना जिंकून देण्यात अपयशी ठरले. अशाप्रकारे न्यूझीलंड संघाने 65 धावांनी मोठा विजय नोंदवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विरोधी संघाला पुरून उरला फिलिप्स; बनला ‘अशी’ कामगिरी करणारा टी20 विश्वचषकातील तिसराच खेळाडू
INDvSA: सामन्याआधी आफ्रिकी खेळाडूची विराटला वॉर्निंग! म्हणाला, ‘तो फॉर्ममध्ये आला असला तरी आमचे गोलंदाज….’