दिवसेंदिवस भारतीय पुरूष क्रिकेट संघाच्या अडचणीत वाढ होत आहे. नुकतेच भारताने मोहाली येथे झालेला टी20 सामना 4 विकेट्सने गमावला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतून मोहम्मद शमी बाहेर झाला. त्याला कोरोना झाला असल्याने तो अजूनही फिट नाही. गुरूवारी (22 सप्टेंबर) त्याची कोरोना टेस्ट होणार होती, मात्र त्याच्या शरीरात कळा येत असल्याने ती आता सोमवारपर्यंत टाळली गेली. तसेच तो फिट नाही झाला तर
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) हा सध्या कोरोनामुळे संघाच्या बाहेर आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार होता, आता मात्र हे कठीण होताना दिसत आहे. तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याआधी कोरोना पॉजिटिव्ह आढळला होता, ज्यामुळे त्याच्याजागी उमेश यादव याला संघात घेतले गेले. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 208 धावांचा डोंगर उभारला असला तरी संघाला 4 विकेट्सने पराभूत व्हावे लागले.
रिपोर्टनुसार, शमीच्या स्थितीत सुधारणा होत आहे, परंतु त्याच्या शरीराचे दुखणे वाढले आहे. ज्यामुळे गुरूवारी होणारी कोरोना टेस्ट तीन दिवसांसाठी टाळण्यात आली.
ऑस्ट्रेलिया 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. यासाठी शमीला संघात जागा दिली आहे. मात्र त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवल्याने अनेकांनी त्याच्यावर प्रश्न निर्माण केले, कारण त्याला मुख्या 15 सदस्यांच्या संघात निवडले नाही.
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांसाठी पूरक आहेत आणि शमी ज्या प्रकारे गोलंदाजी करतो, त्यामुळे त्याला संघात घेणे आवश्यक आहे. त्याने टाकलेला चेंडू उसळी घेतो, ज्यामुळे फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच्याकडे उत्तन वेग आहे. तसेच भारताचा टी20 विश्वचषकाचा संघ पाहिला तर जसप्रीत बुमराह सोडून कोणताच गोलंदाज 140 पेक्षा अधिकाच्या गतीने गोलंंदाजी करणारा नाही. अशा स्थितीत त्याला अंतिम अकरामध्ये स्थान दिले जाऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आयपीएल खेळण्याचा अनुभव कामी आला’, भारताला पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे चकित करणारे विधान
सचिन नावाचे वादळ धडकले इंग्लंडला, 24 वर्षानंतर तेंडूलकरच्या ‘त्या’ शॉटने चाहत्यांना झाली शारजाहची आठवण
झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली