भारतीय संघाला टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या 30व्या सामन्यात रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेकडून 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पर्थ येथे झालेल्या या सामन्यात भारताने एकेवेळी 49 धावांवर 5 विकेट्स गमावले होते. त्यानंतर फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव याने अर्धशतक झळकावत एकट्याच्या दमावर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा घाम काढला तसेच, संघाची धावसंख्या 9 बाद 133 करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या फलंदाजीनंतर जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक केले. आता न्यूझीलंडचे माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही त्याच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) म्हणाले की, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचा टी20तील खेळ अशा स्तरावर आहे, ज्यात त्याच्या खेळातील चुका काढणे खूपच कठीण आहे. सूर्यकुमारच्या फटकेबाजीबद्दल बोलताना फ्लेमिंग म्हणाले की, सूर्याने मैदानात वेगवेगळ्या लेंथवर आपल्या खेळाचे नियंत्रण दाखवले, ज्यामुळे तो यशस्वी झाला.
Ninth score of fifty or more in T20Is in 2022 for Suryakumar Yadav 🙌#INDvSA | #T20WorldCup | 📝: https://t.co/GI5MZQJSjA pic.twitter.com/65ZadokQj8
— ICC (@ICC) October 30, 2022
काय म्हणाले फ्लेमिंग?
“सूर्यकुमार यादव याची मानसिकता खूपच सकारात्मक आहे. त्याचा स्टान्स खूपच खुललेला आणि आक्रमक आहे, त्यामुळे त्याला कुठेही फटका मारण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याने आपले खेळण्याचे तंत्र अशाप्रकारे विकसित केले आहे की, गोलंदाजांना योग्य क्षेत्रात चेंडू टाकण्यासही अडचण येते. कारण, त्यांनी फुल लेंथचा चेंडू फेकला, तर कव्हर्सच्या वरून शॉट जाईल आणि जर चेंडू शॉर्ट टाकला, तर थर्ड मॅन किंवा पॉईंटच्या वरून चेंडू जाईल,” असे फ्लेमिंग म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “तो सरळ शॉटही मारतो. तो शॉर्ट चेंडूवर चांगला प्रहार करतो. त्याने असे काही तंत्र विकसित केले आहे, ज्यामध्ये चुका काढणे खूप कठीण आहे.”
सूर्यकुमार यादव याने विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात तडाखेबंद फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 40 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 68 धावा चोपल्या होत्या. त्याच्या या धावांपूर्वी शंभर धावा होणे कठीण वाटत होत्या, पण जेव्हा त्याने वादळी खेळी साकारली, तेव्हा भारताला 133 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. मात्र, शेवटी हा सामना गमवावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुढील सामन्यात राहुल, कार्तिकला संघाबाहेर काढणार का रोहित? 3 बदल खूपच महत्त्वाचे
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये वॉर्नरची बॅट अद्याप शांतच, आयर्लंडविरुद्धही गमावली स्वस्तात विकेट