यावर्षी म्हणजेच 2022मध्ये टी20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सध्या अव्वलस्थानी कोणाचे नाव आहे? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर आहे सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येऊन फक्त 1 वर्ष उलटलं आहे. तरीही तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेषत: टी20 क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा काळ बनला आहे. याचा पुरावा म्हणजे, 2022मध्ये टी20 क्रिकेटमधील त्याची कामगिरी. तो यावर्षी टी20त सर्वाधिक धावा चोपणारा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 25 चेंडूत नाबाद 51 धावा चोपल्या होत्या. म्हणजेच, त्याने 200हून अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. तो टी20 क्रिकेटमध्ये इतका हिट का होतोय?, तर यामागील कारण आहे त्याची पत्नी देविशा शेट्टी (Devisha Shetty). तिने एक नियम बनवला आहे, जो सूर्यकुमार प्रत्येक सामन्यापूर्वी वापरतो.
पत्नीच्या ‘या’ नियमामुळे सूर्याला मिळते मदत
माध्यमांतील वृत्तांनुसार, सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टी (Suryakumar Yadav’s Wife Devisha Shetty) ही प्रत्येक सामन्यापूर्वी सूर्यकुमारकडून त्याचा मोबाईल काढून घेते. जेणेकरून पती सूर्यकुमार बाहेरच्या जगात त्याच्याबद्दल सुरू असणाऱ्या गोष्टींवरून दुर्लक्षित होऊ नये. तसेच, त्याचे संपूर्ण लक्ष सामन्यावर राहील. हाच नियम सूर्यकुमारला यशस्वी बनवत आहे. सूर्यकुमार प्रत्येक सामन्यापूर्वी स्वत:ला मोबाईलपासून दूर ठेवतो. त्यामुळे त्याला फलंदाजी किंवा सामन्यात उतरताना संपूर्ण लक्ष देऊन खेळण्यास मदत मिळते. या कारणामुळे तो कोणत्याही दबावाशिवाय शानदार फलंदाजी करू शकतो.
https://www.instagram.com/p/CkFzPx9o2l8/?utm_source=ig_web_copy_link
सूर्याचे नेदरलँड्सविरुद्ध 25 चेंडूत अर्धशतक
यावर्षी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा पाऊस पाडणारा सूर्या सध्या जबरदस्त आत्मविश्वासाने फलंदाजी करत आहे. याचा प्रत्यय नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातून येईल. सूर्यकुमारने या सामन्यातील 12व्या षटकात खेळण्यासाठी आला होता. त्यावेळी भारताची धावसंख्या 2 विकेट्स गमावत 82 धावा होती. मात्र, सूर्यकुमार फलंदाजीला येताच सर्व समीकरण बदलले. त्याने शेवटच्या 8 षटकात म्हणजेच 48 चेंडूत विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत नाबाद 95 धावांची भागीदारी रचली आणि भारताला 180 धावांचे आव्हान उभे करण्यात मोलाचे योगदान दिले. सूर्यकुमारने या सामन्यात 25 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 51 धावा चोपल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेंटरबरोबर बॅटींग कोच एमएस धोनी! हार्दिक पंड्या-रिषभ पंतला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
‘आऊट ऑफ फॉर्म’ केएल राहुल विराट कोहलीच्या वाटेवर, ‘या’ व्यक्तिकडून मागितला गुरुमंत्र!