आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) आगामी टी20 विश्वचषकासाठी स्टार समालोचकांची यादी जाहीर केली आहे. आयसीसीनं या स्पर्धेसाठी एकूण 40 समालोचकांची निवड केली, ज्यामध्ये रवी शास्त्री, इयान बिशप, हर्षा भोगले आणि रिकी पाँटिंग यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत हे सर्व 40 दिग्गज आपल्या विश्लेषणानं आणि लाइव्ह कॉमेंट्रीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतील.
मोठी बातमी म्हणजे, आयसीसीनं या पॅनलमध्ये दिनेश कार्तिकलाही ठेवलं आहे. कार्तिकनं अलीकडेच आयपीएलला अलविदा केला होता. त्यानं गेल्या काही समालोचनाच्या क्षेत्रातही स्वतःचं नाव कमावलं आहे. या जोरावर आता त्यानं टी20 विश्वचषकात प्रवेश केला.
कार्तिकसह दिग्गज रिकी पाँटिंग, सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन, रमिझ राजा, इऑन मॉर्गन, टॉम मूडी आणि वसीम अक्रम हे देखील आगामी विश्वचषकात खेळाचं विश्लेषण करताना दिसतील. तर अमेरिकन समालोचक जेम्स ओब्रायन यांच्यावर अमेरिकन प्रेक्षकांना क्रिकेटशी जोडण्याची जबाबदारी आहे.
टी20 विश्वचषकाला येत्या 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण 55 सामने खेळले जातील. यंदा अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन करत आहेत. पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल.
टी20 विश्वचषकासाठी 40 समालोचकांची यादी
दिनेश कार्तिक, इयान बिशप, हर्षा भोगले, रवी शास्त्री, शॉन पोलॉक, रिकी पाँटिंग, स्टीव्हन स्मिथ, नासेर हुसैन, ग्रॅम स्मिथ, इयान स्मिथ, डॅनी मॉरिसन, डेल स्टेन, ॲलन विल्किन्स, वकार युनिस, वार्ड, लिसा स्टालेकर, वसीम अक्रम, अथर अली खान, रसेल अरनॉल्ड, मायकेल अथर्टन, सॅम्युअल बद्री, कार्लोस ब्रॅथवेट, सायमन डौल, ॲरॉन फिंच, डॅरेन गंगा, सुनील गावस्कर, नताली जर्मनोस, मॅथ्यू हेडन, माईक हेझमन, जेम्स ओब्रायन ‘झोम्बॉय’, केटी मार्टिन, पॉमी बंगवा, टॉम मूडी, इयॉन मॉर्गन, ब्रायन मुर्गाट्रॉयड, कॅस नायडू, नील ओ’ब्रायन, इबोनी रेनफोर्ड-ब्रेंट आणि रमीझ रजा.
महत्त्वाच्या बातम्या –
एलिमिनेटर सामन्यातील पराभवानंतर विराट कोहली झाला भावूक; म्हणाला, “आम्ही सन्मानासाठी खेळलो आणि…”
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या नात्यात दुरावा? इंस्टाग्रामवरून आडनाव हटवल्यामुळे खळबळ!