भारताचा माजी दिग्गज खेळाडू वसीम जाफरने 2024 च्या टी20 विश्वचषकाबाबत भविष्यवाणी केली आहे. जाफरने यावेळी दोन संघांच्या नावांबद्दल सांगितले आहे. टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. यावेळी प्रथमच टी20 विश्वचषकाचे सामने अमेरिकेत खेळवले जात आहेत. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध टी20 विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत प्रथमच एकूण 20 संघ सहभागी होत आहेत.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना माजी भारतीय दिग्गजाने टी20 विश्वचषकाबाबत एक भविष्यवाणी केली आहे. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतील, असे जाफरला वाटते. याबाबत जाफर म्हणाला, “मला वाटतं यावेळीही फायनल भारत आणि ऑस्ट्रेलियामध्येच होईल.”
याशिवाय जाफरने उपांत्य फेरीत प्रवेश करु शकणाऱ्या चार संघांची नावेही निश्चित केली आहेत. जाफरच्या मते, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. या माजी भारतीय क्रिकेटपटूनेही कोहलीबाबत भाष्य केले आहे. जाफरला वाटते की यावेळी T20 विश्वचषकातील स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू विराट कोहली असेल, तर जाफरचा असा विश्वास आहे की यावेळी बुमराह भारतासाठी एक्स फॅक्टर आहे आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेऊ शकतो.
माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने अफगाणिस्तान संघाला असे मानले आहे की ज्या संघात खूप चांगले खेळाडू आहेत आणि या संघात सर्वात मोठ्या संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. टी20 विश्वचषकाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावले आहे, तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचे संघ दोनदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरले आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
विराट कोहलीनं सलामीला यावं की नाही? माजी खेळाडूनं दिली प्रतिक्रिया
युसूफ पठाणचे निवडणुकीच्या मैदानावर वर्चस्व! पाच वेळेच्या विद्दमान खासदारला चारली धूळ
भारतीय संघाची ट्रॉफीपेक्षा ‘या गोष्टीवर’ जास्त भर! राहुल द्रविडने केली खुलासा