यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतीय संघानं धडाकेबाज सुरुवात केली आहे. भारतानं पहिल्याच सामन्यात आयर्लंडवर विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अटीतटीची लढत पाहायला मिळाली त्यामध्ये भारतानं 6 धावांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. परंतु पाकिस्ताननं यंदाच्या टी20 विश्वचषकात खूप खराब सुरुवात केली आहे. त्यांनी पहिला सामना अमेरिकेबरोबर खेळला. त्यामध्ये त्यांचा सुपरओव्हरमध्ये निराशाजनक पराभव झाला. तर दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला धूळ चारली.
भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान जवळजवळ या टी20 विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडलं आहे. परंतु त्यांच्या ‘सुपर 8’ मध्ये पोहचण्याच्या आशा थोड्याफार जिवंत आहेत. पाकिस्तानचं पुढचं दोन सामनं आयर्लंड आणि कॅनडा या दोन संघांविरुद्ध आहेत. त्यामध्ये त्यांना खूप मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. जेणेकरुन पाकिस्तान ‘सुपर 8’ मध्ये क्वालिफाय करण्याच्या स्पर्धेत जिवंत राहतील.
यंदाच्या टी20 विश्वचषकात 20 संघ सहभागी आहेत. त्यामध्ये एका ग्रुपमध्ये पाच संघ असे चार ग्रुप केले आहेत. पाकिस्तान, भारत हे संघ ग्रुप-अ मध्ये समाविष्ट आहेत. चार ग्रुपमधून प्रत्येकी दोन संघ ‘सुपर 8’ साठी क्वालिफाय करतील. परंतु ग्रुप-अ मध्ये भारतीय संघासोबत क्वालिफाय करण्यासाठी अमेरिका प्रबळ दावेदार मानलं जात आहे. कारण अमेरिकेनं 2 सामनं खेळून दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून भारत गुणतालिकेत शीर्ष स्थानी आहे. तर अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे आणि पाकिस्तान संघ अद्याप एकही सामना जिंकला नाही. पाकिस्तान गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.
पाकिस्तानला ‘सुपर 8’ मध्ये क्वालिफाय करण्यासाठी त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. पाकिस्तान दोन्ही सामने जिंकले तर गुणतालिकेत त्यांचे 4 गुण होतील. त्यानंतर त्यांना प्रार्थना करावी लागेल की, भारत आणि अमेरिका यांच्यामधील एक संघ त्यांचे उर्वरित दोन सामने गमावेल आणि नंतरच पाकिस्तान संघ ‘सुपर 8’ मध्ये क्वालिफाय होण्यासाठी पात्र राहिल. परंतु असे होणे खूप अवघडं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्याने विकले चक्क ट्रॅक्टर, हाती मात्र निराशाच
पराभवानंतर पाकिस्तानमध्ये फुटणाऱ्या टीव्हींवरून दिल्ली पोलिसांनी उडवली खिल्ली, ट्वीट व्हायरल
विजयानंतरही भारतीय संघात हे 3 बदल आवश्यक, रोहित शर्माच्या हातून या चुका पुन्हा घडायला नको