---Advertisement---

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्याने विकले चक्क ट्रॅक्टर, हाती मात्र निराशाच

---Advertisement---

भारतीय संघाने 120 धावांचा बचाव करताना पाकिस्तानवर शानदार विजय मिळवाला आहे. यासोबतच टीम इंडियाने गुप्र ‘ए’ टेबलच्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान गाठला आहे. भारताने सलग दोन सामन्यात विजय मिळवून 4 गुणांनी पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. ज्यामध्ये भारताचा नेट रनरेट 1.455 वर पोहचला आहे. तर दुसरीककडे सलग दोन पराभवामुळे पाकिस्तान चाैथ्या स्थानी पोहचला आहे. बाबर आझमच्या पाकिस्तान संघाला आपले खाते सुद्धा आणखी उघडता आले नाही. पाकिस्तानच्या या पराभवाने एका चाहत्याचे हृदय तुटले आहे.

न्यूयॉर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये पाकिस्तानच्या एका चाहत्याने आपला ट्रॅक्टर विकून मॅच पाहण्यासाठी आला होता. एएनआयशी बोलताना त्याने सांगितले की, या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी त्याने आपला ट्रॅक्टर तीन हजार डॉलरला विकला होता. त्या व्यक्तीने सांगितले की जेव्हा त्याने भारताची धावसंख्या पाहिली तेव्हा त्याला वाटले की आपले पैसा वसुल होईल, पण तसे झाले नाही. भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आणि त्याच्या इच्छा धुडकावून लावल्या. सामन्यानंतर त्या व्यक्तीने पाकिस्तान संघाला अधिक मेहनत करण्याचा सल्ला दिला.

टीम इंडियाने दिलेल्या 120 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने सावध सुरुवात केली. पण बुमराहच्या दुसऱ्या षटकात बाबर आझम झेलबाद झाला. सुर्यकुमार यादवने त्याचा स्लिपवर उत्तम कॅच घेतला. टीम इंडियाने मधल्या षटकात कसून गोलंदाजी केली, पाकिस्तानी फलंदाजांना हात मोकळे कराण्यासाठी कोमतीही संधी दिली नाही. ज्यामुळे शेवटच्या षटकांत पाकिस्तानवर आतिरिक्त दबाव आल्याने संघास कमी धावसंख्या असतानाही विजय मिळवत आले नाही.

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानविरुद्ध भारताने रचला इतिहास, 120 धावांचा बचाव करुन केला मोठा विक्रम!
शिवम दुबेचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! रिंकूला संघात न घेणं पडणार महागात?
पाकिस्तानविरुद्ध भारताने रचला इतिहास, 120 धावांचा बचाव करुन केला मोठा विक्रम!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---