---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध भारताने रचला इतिहास, 120 धावांचा बचाव करुन केला मोठा विक्रम!

---Advertisement---

भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतील 19 व्या सामन्यात रविवारी (9जून) पाकिस्तानला 6 धावांनी धूळ चारली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्तवाखाली टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 19 षटकात 119 धावांवर सर्वबाद झाला. परंतू या कमी धावसंख्येचा बचाव करत भारताने शानदार विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाने जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. भारतीय संघाने टी20 सामन्यामधील सर्वात कमी धावसंख्या डिफेंड केला आहे.

याआधी टी20 सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वे 2016 साली विरुद्ध सर्वात कमी 139 धावसंख्येचा बचाव केला होता. पण आता हा विक्रम पाकिस्तान विरुद्ध नोंदवला आहे. टीम इंडियाने टी20 विश्वचषक 2024 मध्ये काल पाकिस्तान विरुद्ध 120 धावांचा लक्ष्य दिला होता, प्रत्युत्तरात पाकिस्तान 113 धावा काढू शकला.

भारताने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला
120 धावा- वि. पाकिस्तान, न्यूयॉर्क, 2024
139 धावा- झिम्बाब्वे, हरारे, 2016
145 धावा- इंग्लंड, नागपूर, 2017
147 धावा- विरुद्ध बांगलादेश, बेंगळुरू, 2016

टी20 विश्वचषकातील सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव केला
120 धावा- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड, चट्टोग्राम, 2014
120 धावा- भारत विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क, 2024
124 धावा- अफगाणिस्तान, विरुद्ध वेस्ट इंडिज, नागपूर, 2016
127 धावा- न्यूझीलंड विरुद्ध भारत, नागपूर, 2016
129 धावा- दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, लॉर्ड्स, 2009.

भारतीय संघाने या सामन्यात गोलंदाजीत सर्वश्रेष्ठ कामगिरी केली. कमी टार्गेटचा बचाव करण्यासाठी म२दानात उतलेले भारतीय गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली आहे, जसप्रीत बुमराहने 4 षटकात 14 धावा देत 4 विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पांड्याने देखील 2 महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. एकूणच भारतीय संघाच्या गोलंदाजी समोर पाकिस्तान संघ ढेपाळला. मबारतीय संघाने 120 धावांचा बचाव करताना पाकिस्तानला 113 धावांवर रोखला आमि 6 धावांनी शानदार विजय मिळवला.

महत्तवाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या विजयानंतर जय शहांचा आनंद गगनात मावेना! केले अनोखे सेलिब्रेशन, पाहा VIDEO
सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांना नामांकन, कोणाला मिळालं पदक?
शिवम दुबेचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! रिंकूला संघात न घेणं पडणार महागात?

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---