---Advertisement---

पराभवानंतर पाकिस्तानमध्ये फुटणाऱ्या टीव्हींवरून दिल्ली पोलिसांनी उडवली खिल्ली, ट्वीट व्हायरल

On: सोमवार, जून 10, 2024 4:02 PM
INDIA TEAM
---Advertisement---

आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 19वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला गेला. न्यूयाॅर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतानं उत्कृष्ट कामगिरी केली. ज्यामध्ये भारतानं पाकिस्तानचा 6 धावांनी दारुण पराभव केला. संपूर्ण भारतभर या विजयाचा जल्लोष झालेला सोशल मीडियावर पाहायला मिळाला. तत्पूर्वी या सामन्यानंतर एका दिल्ली पोलिसाचं ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये दिल्ली पोलिसानं लिहलं पाकिस्तानच्या पराभवानंतर दोन खूप मोठे आवाज एकू आले.

यंदाच्या टी20 विश्वचषकात रोहितच्या सेनेनं पाकिस्तानला 6 धावांनी धूळ चारत शानदार विजयाला गवसणी घातली. या थरारक विजयानंतर भारतामध्ये सर्वत्र आनंद चालू होता. यादरम्यान एका दिल्ली पोलिसानं ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर टाकलेली पोस्ट खूप व्हायरल झाली. या पोलिसानं ट्वीट केल्यानंतर काही तासात या पोस्टवर वापरकर्त्यांनी धडाधड लाईकचा वर्षाव केला आणि ही पोस्ट सर्वत्र व्हायरल करुन टाकली.

 

भारत आणि पाकिस्तान या सामन्यापूर्वी दिल्ली पोलिसानं भारतीय संघाला शुभेच्छा देत ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर त्यानं भारतीय संघानं विजय मिळवल्यानंतर पुन्हा अजून एक पोस्ट शेअर केली, जी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली.

 

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खूप रोमांचक पाहायला मिळाला. तसंच अटीतटीची लढतदेखील पाहायला मिळाली. या सामन्यात भारतासाठी रिषभ पंतन सर्वाधिक धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 31 चेंडूत 42 धावांची खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं उत्कृष्ट 6 चौकार लगावले. तर भारतासाठी 4 ओव्हर फेकून जसप्रीत बुमराहनं 14 धावा देत सर्वाधिक 3 बळी त्याच्या नावी केले आणि भारताला सामना जिंकवून दिला. सामन्यानंतर बुमराहला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या-

विजयानंतरही भारतीय संघात हे 3 बदल आवश्यक, रोहित शर्माच्या हातून या चुका पुन्हा घडायला नको
बलात्काराच्या आरोपानंतर विश्वचषकात पुनरागमनं, वेस्ट इंडिजमध्ये खेळणार ‘हा’ स्टार क्रिकेटपटू
पाकिस्तानविरुद्ध भारताने रचला इतिहास, 120 धावांचा बचाव करुन केला मोठा विक्रम!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---