यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं चमकदार कामगिरी केली. फायनल सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवून टी20 विश्वचषकाच्या ट्राफीवर नाव कोरले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं 13 वर्षांनंतर आयसीसी ट्राॅफी उंचावली. तर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकाचा कार्यकाळ संपला. भारतानं टी20 विश्वचषक जिंकण्यामागे त्यांचं मोलाचं योगदानं राहिलं. अशा परिस्थितीत ते खूप भावूक झाले होते. त्यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले.
या टी20 विश्वचषकासह राहुल द्रविड यांचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडल्याबद्दल त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. पीटीआयशी बोलताना ते म्हणाला की, “पुढच्या आठवड्यात मी बेरोजगार होईल. आयुष्य असेच राहील (हसत). मला वाटतं की हा एक अद्भुत क्षण आहे. मी त्याचा आनंद घेत आहे. मला फार पुढचा विचार करायचा नाही. यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. आयुष्य असं आहे. तुम्ही तुमचे सर्वोत्तम काम करता, तुम्ही कठोर परिश्रम घेता आणि जे काही तुमच्या मार्गावर येते, त्याला तुम्ही सामोरे जाऊन पुढे जाता.”
पुढे बोलताना राहुल द्रविड म्हणाले, “मला रोहित शर्माची खूप आठवण येईल. मी त्याला कर्णधार किंवा खेळाडू म्हणून नव्हे तर एक चांगला मित्र म्हणून लक्षात ठेवेन. आशा आहे की आम्ही अजूनही मित्र राहू. मला वाटते की तो ज्या प्रकारचा व्यक्ती आहे, त्याने मला दिलेला आदर, संघासाठी त्याच्या काळजीनं मला खरोखर प्रभावित केले. हा व्यक्ती मला सर्वात जास्त आठवेल. तो एक महान कर्णधार असेल, एक महान खेळाडू असेल पण त्याचीच मला सर्वात जास्त आठवण येईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमारच्या पत्नीनं शेअर केली एक खास पोस्ट…!
हॉकी पुणे लीग : विक्रांत वॉरियर्सचा विक्रमी विजय, पूना हॉकी अकॅडमीची किड्स अकॅडमीवर 10-0 अशी मात
सूर्यकुमार यादवच्या एका कॅचमुळे फिरला सामना! जय शाहंच्या हस्ते मिळाला विशेष पुरस्कार