यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेतून सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर पडलेला न्यूझीलंड संघानं शेवटचा साखळी सामना पापुआ न्यू गिनीविरुद्ध खेळला. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसननं इतिहास रचला.
कॅनडाच्या साद बिन जफरन 2021 साली पनामाविरुद्धच्या सामन्यात 4 षटकांच्या स्पेलमध्ये चारही निर्धाव षटक फेकले होते. त्यामध्ये त्यानं दोन विकेट्स घेतल्या होत्या आणि आता अशी कामगिरी करणारा लॉकी फर्ग्युसन हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. फर्ग्युसननं चार षटकांच्या स्पेलमध्ये चारही निर्धाव षटकं टाकली आणि 3 विकेट्स घेतल्या. परंतु टी20 विश्वचषकाच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज ठरला.
न्यूझीलंडच्या गोलंदाजीच्या 4.1 षटकात फर्ग्युसननं पीएनजीचा कर्णधार असद वालाला डॅरेल मिचेलच्या हातामध्ये झेलबाद केलं. चार्ल्स अमिनी 11.2 षटकांत एलबीडब्ल्यू झाला आणि चाड सोफरचा 13.2 षटकांत त्रिफळा उडवून तिसरी विकेट घेत इतिहास रचला.
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) यावेळी न्यूझीलंड संघ काही खास कामगिरी करु शकला नाही. न्यूझीलंड संघाला क गटात अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, युगांडा आणि पापुआ न्यू गिनीसह ठेवण्यात आले होते आणि न्यूझीलंड संघाची धुरा केन विल्यमसनकडे होती. मात्र, त्याच्या संघाला आधी अफगाणिस्तान आणि नंतर वेस्ट इंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागला.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निर्धाव षटक फेकणारे खेळाडू-
2/0 (4) साद बिन जफर (कॅनडा) विरुद्ध पनामा, कूलिज, 2021
3/0 (4) लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) विरुद्ध पापुआ न्यू गिनी, तारुबा, 2024*
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडनं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
टी20 विश्वचषकादरम्यान गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
जॉन्टी रोड्स बनणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?