---Advertisement---

जॉन्टी रोड्स बनणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?

---Advertisement---

यंदाच्या टी20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेत्तृतवाखालील भारतीय संघाने शानदार कामगिरी केले आहे. साखळी फेरीत संघाने तीन सामन्यात सलग विजय मिळवून सुपर-8 मध्ये पात्र झाला आहे. अश्या परिस्थितीत बीसीसीआय भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या पदा साठी गाैतम गंभीरचे नाव फिक्स झाल्याचे म्हंटले जात आहे. पण अद्याप बीसीसीआय कडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता या दरम्यान बीसीसीआय भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी रोड्स च्या विचारात असल्याचे समोर आले आहे.

यंदाच्या टी20 विश्वचषकानंतर सध्याचे भारतीय संघाचे हेड कोच राहुल द्रवीड यांचा कार्यकाळ संपणार आहे. या दरम्यान बीसीसीआय या पदासाठी गाैतम गंभीरची निवड करण्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता अश्या स्थितीत भारतीय संघ क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी देखील विचार करत असल्याचे समोर आले आहे. तर या पदा साठी जॉन्टी रोड्सचे नाव सध्या समोर येत आहे. पण ह्या संदर्भात बीसीसीआय अद्याप कोणतेही भाष्य केले नाही.

 

दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ग्रेट फिल्डर जॉन्टी रोड्सनी भारतीय संघासाठी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी 2019 रोजी अर्ज केले होते. पण त्तकालीन हेड कोच रवी शास्त्री यांनी आर श्रीधर यांना पहिली पसंती दिली होती. तर 2021 साली जॉन्टीने पुन्हा अर्ज केले नाही. जॉन्टी रोड्स सध्या लखनऊ सुपर जायंट्सचा फिल्डिंग कोच आहे. त्याचबरोबर तो डर्बन सुपर जायंट्सचा देखील फिल्डिंग कोच आहे. या व्यतिरिक्त जॉन्टीने  श्रीलंका क्रिकेट संघ, पंजाब किंग्ज, स्विडन क्रिकेट फेडरेशन यांच्यासाठी काम केले आहे.

सध्याचे हेड कोच राहुल द्रविडने त्यावेळी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी.दिलीप यांची निवड राहुल द्रविड यांनी केली होती.  मात्र शेवटी मुख्य प्रशिक्षकच आपल्याला हवा असलेला फिल्डिंग कोच निवडतो. 2019 नंतर भारतीय संघ व्यस्थापनाने कोचिंग स्टाफ मध्ये भारतीय सदस्य निवडले आहेत. यंदाच्या टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफ मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. गाैतम गंभीर सोबतच सर्व नवा कोचिंग स्टाफ असण्याची शक्यता आहे.

महत्तवाच्या बातम्या-

सुपर-8 सामन्यांपूर्वी विराट कोहलीचा कूल अंदाज, रिंकू-जयसवालही संघात दाखल, व्हिडिओ व्हायरल
नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला तर कोण जिंकेल? वसीम अक्रमची प्रतिक्रिया व्हायरल
स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात घेतला धक्कादायक झेल! मैदानावरील कोणाचाच विश्वास बसेना; VIDEO एकदा पाहाच

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---