---Advertisement---

सुपर-8 सामन्यांपूर्वी विराट कोहलीचा कूल अंदाज, रिंकू-जयसवालही संघात दाखल, व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मध्ये शानदार स्टाईलमध्ये प्रवेश केला. यादरम्यान सुपर-8 मध्ये भारतीय संघाची  प्लेइंग इलेव्हनबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.  पण संघातील  खेळाडू मात्र या मुद्द्यांपासून कोसो दूर आहेत. विराट कोहली ज्याच्या फ्लॉप शोमुळे सगळ्यांचे टेन्शन वाढले आहे. मात्र सुपर-8  फेरीपूर्वी कोहली कोणत्याही तणावाशिवाय टीम इंडियासोबत बीचवर व्हॉलीबॉलचा आनंद घेताना दिसला. असे अनेक खेळाडूही या खेळात सहभागी झाले होते. ज्यांना अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.

वास्तविक, बीसीसीआयने सोशल मीडिया प्लटफाॅर्म X वर समुद्र किनाऱ्यावरील एक व्हिडिओ शेअर केले आहे. ज्यामध्ये भारतीय संघातील सर्व खेळाडू दिसत आहेत. या दरम्यान व्हिडिओमध्ये खलील अहमद सांगत आहे की आमच्या टीममध्ये रिंकू सिंग आणि यशस्वी जैस्वाल या दोन महान खेळाडू आहेत. या व्हिडिओमध्ये शिवम दुबे, रिंकू सिंग, जयस्वाल आणि युझवेंद्र चहल यांच्यासह अनेक खेळाडू शानदार खेळताना दिसत आहेत.

 

यंदाच्या विश्वचषकातील सुपर-8 फेरीस 19 जून पासून सुरुवात होणार आहे. या स्थितीत भारताचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी संघात प्लेइंग इलेव्हन मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण हा सामना वेस्ट इंडिज येथे होणार आहे तेथे फिरकीपटूंना चांगली मदत मिळते. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या संघात तीन फिरकीपटू दिसू शकतात. त्याचबरोबर काही खेळाडूंना बाहेरही व्हावे लागू शकते. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या संघात तीन फिरकीपटू दिसू शकतात. त्याचबरोबर काही खेळाडूंना बाहेरही व्हावे लागू शकते.

सुपर-8 मधील सामन्यात विराट कोहली वर मात्र सर्वांचे लक्ष राहणार आहे. यंदाचे टी20 विश्वचषक स्पर्धा विराट कोहलीसाठी चांगली राहली नाही. पण सुपर-8 मधील सामन्यात विराट कोहलीची बॅट चालणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे कोहली कोणत्या  क्रमांकावर फलंदाजी करेल,  हे पाहणे महत्तवाचे राहणार आहे.

महत्तवाच्या बातम्या-

नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला तर कोण जिंकेल? वसीम अक्रमची प्रतिक्रिया व्हायरल
स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात घेतला धक्कादायक झेल! मैदानावरील कोणाचाच विश्वास बसेना; VIDEO एकदा पाहाच
‘फादर्स-डे’ च्या दिवशी हार्दिकनं शेअर केला मुलासोबतचा खास व्हिडीओ, पत्नी नताशाकडे दुर्लक्ष

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---