---Advertisement---

टी20 विश्वचषकादरम्यान गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

---Advertisement---

लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्रपक्षांसह सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. एनडीए सरकारच्या स्थापनेनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. नूकत्याच झालेल्या निवडणुकीत अमित शाह यांना मिळालेल्या यशाबद्दल गंभीरने त्यांचे अभिनंदन केले. त्यानी त्यांच्या आणि अमित शाह यांच्या भेटीचा फोटो ‘X’ अकाऊंटवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की “आदरणीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारत सुरक्षिततेच्या बाबतीत अधिक चांगला होईल आणि देशात स्थिरता वाढेल.”

 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरने भाजपचे उमेदवार म्हणून पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवली होती. गंभीरने त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना यांचा 695109 मतांनी पराभव केला होता. आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, माजी क्रिकेटपटूने 2 मार्च 2024 रोजी जाहीर केले होते की तो राजकारण सोडत आहे आणि भविष्यात फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे.

गौतम गंभीर सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 30 जून रोजी T20 वर्ल्ड कपनंतर लगेचच संपत आहे. अलीकडील काही रिपोर्ट्सनुसार, द्रविडनंतर गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे. मात्र, त्यांनी बीसीसीआयसमोर काही मागण्या ठेवल्या होत्या, त्या बोर्डाने मान्य केल्या आहेत.

महत्तवाच्या बातम्या-

भारतासाठी ‘या’ 3 दिग्गज खेळाडूंचा असणार शेवटचा टी20 विश्वचषक?
जॉन्टी रोड्स बनणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?
सुपर-8 सामन्यांपूर्वी विराट कोहलीचा कूल अंदाज, रिंकू-जयसवालही संघात दाखल, व्हिडिओ व्हायरल

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---