यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाची (ICC T20 World Cup) सुरुवात रोमांचक झाली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात हा विश्वचषक खेळला जात आहे. तत्पूर्वी टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात नेपाळ संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. नेदरलँड संघानं 6 गडी राखून नेपाळवर विजय मिळवला होता. परंतु नेपाळसाठी एक आनंदाची गोष्ट ही आहे की, संघाचा अनुभवी गोलंदाज संदीप लामिछानेची (Sandeep Lamichhane) टी20 विश्वचषकात एँट्री झाली आहे.
संदीप लामिछाने नेपाळसाठी ग्रुप स्टेजमधील वेस्ट इंडीजमध्ये होणारे सामने खेळणार आहे. लामिछानेला अमेरिकेनं व्हिजा देण्यासाठी नकार दिला होता. परंतु वेस्ट इंडिजमध्ये खेळण्यासाठी त्याला परवानगी मिळाली आहे. लामिछाने नेपाळच्या क्रिकेटसाठी कथी एक ब्रँड अँम्बेसिडर होता. परंतु त्याच्यावर काठमांडूच्या एका हाॅटेलमध्ये तरुणीसोबत झालेल्या प्रकरणात बलात्काराचा आरोप लागला होता. मागच्या महिन्यात त्याला खूप निराशाजनक गोष्टींचा सामना करावा लागला. त्याच्यानंतर चर्चा सुरु झाली होती की, तो टी20 विश्वचषक खेळणार आहे.
परंतु अमेरिकेनं त्याला व्हिजा देण्यासाठी नकार दिला. त्यामुळे टी20 विश्वचषक खेळणे त्याच्यासाठी अवघड वाटत होते, पण आता त्याला टी20 विश्वचषक खेळण्यासाठी परवानगी मिळाली आहे. लामिछानेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तो वेस्ट इंडिजला पोहचल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानं त्याच्या पोस्टमार्फत नेपाळ सरकार आणि सर्व चाहत्यांचं आभार मानलं आहेत.
संदीप लामिछानेनं त्याच्या पोस्टमध्ये लिहलं की, “सर्वात आधी मी नेपाळ सरकार, विदेशी मंत्रालय, राष्ट्रीय क्रीडा परिषद, क्रीडा परिषद आणि नेपाळ क्रिकेट संघाला धन्यवाद देतो. ज्यांनी मला अमेरिका व्हिजा मिळवून देण्यासाठी मदत केली, पण दुर्दैवानं ते शक्य झालं नाही. परंतु या गोष्टींकडे आता दुर्लक्ष्य करुन मी राष्ट्रीय संघात समाविष्ट झालो आहे आणि सर्व क्रिकेट चाहत्यांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या विजयानंतर जय शहांचा आनंद गगनात मावेना! केले अनोखे सेलिब्रेशन, पाहा VIDEO