आयसीसी टी20 विश्वचषक 2024चा (ICC T20 World Cup 2024) 11वा सामना पाकिस्तान विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला गेला. अमेरिकेतील ग्रॅड पेरी स्टेडिमवर हा सामना रंगला होता. यामध्ये अमेकिरेनं पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये चितपट केलं. पाकिस्तानचा यंदाच्या टी20 विश्वचषकातील पहिलाच सामना होता. या सामन्यात पाकिस्तानला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान संघ हारल्यामुळे कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे.
अमेरिकेनं टाॅस जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्याबदल्यात पाकिस्तान 7 विकेट्सवर केवळ 159 धावा करु शकला. यामध्ये कर्णधार बाबर आझमनं पाकिस्तानसाठी 43 चेंडूत 44 सर्वाधिक धावा बनवल्या. यादरम्यान त्यानं 3 चौकारांसह 2 षटकारदेखील लगावले. परंतु त्याचा स्ट्राईक रेट 102.33 राहिला. यामुळे बाबर आझमनं अमेरिकेसारख्या संघापुढं केवळ 102.33च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली, असल्या कारणानं त्याच्यावर पाकिस्तानचे दिग्गज खेळाडूदेखील वैतागले आहेत.
बाबर आझमच्या (Babar Azam) कर्णधारपदात पाकिस्तानला त्यांच्यापेक्षा कमजोर संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. शेवटच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानला झिम्बाब्वे सारख्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. बाबरच्या कर्णधारपदात पाकिस्तानचा अमेरिका, आयर्लंड, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान या संघांकडून दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे बाबरच्या सोशल मीडियावर मीम्स बनवल्या जात आहेत आणि पाकिस्तानचे दिग्गज खेळाडूदेखील त्याला फटकारत आहेत.
बाबर आझम टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना मागे टाकून सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. परंतु या गोष्टींकडे सध्या कुणाचं लक्ष्य नाही. कारण पाकिस्तानसह कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल होत आहे.
Babar Azam is the first captain to lose to Afghanistan, Zimbabwe, Ireland and America 😂#PakvsUSA pic.twitter.com/nnPx2PrjAJ
— Gagan🇮🇳 (@1no_aalsi_) June 6, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटसाठी 2024-25 चे वेळापत्रक केले जाहीर!
पाकिस्तानला पाणी पाजणाऱ्या सौरभ नेत्रावळकरचा मराठमोळा अंदाज! सलील कुलकर्णींनी शेअर केला सुरेल आवाजाचा व्हिडिओ
महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीला भारतीय संघाचा निरोप; शेवटच्या सामन्यात मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’!