---Advertisement---

अशी आहेत पाकिस्तानसाठी ‘क्वालिफाय’ समीकरणे, पाहा कोणत्या संघाचा होणार पत्ता कट

On: शुक्रवार, जून 14, 2024 3:03 PM
USA VS IRE (1)
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) आज (14 जून) रोजी 30वा सामना खेळला जाणार आहे. अमेरिका (USA) विरुद्ध आयर्लंड (IRE) हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी फ्लोरिडाच्या मैदानावर 20 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याच्या आशा या सामन्यावर अवलंबून आहेत.

या सामन्यात जर अमेरिकेनंं बाजी मारली तर पाकिस्तान यंदाच्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडणार आहे. कारण पाकिस्तानचा संघ सुपर 8 साठी क्वालिफाय करु शकणार नाही. अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामन्यात पाउस जरी आला तरीही पाकिस्तानच्या सुपर 8 मध्ये पोहचण्याच्या सर्व आशा संपुष्टात येणार आहेत. परंतु आयर्लंडनं जर या सामन्यात अमेरिकेला धूळ चारली. तर पाकिस्तान यंदाच्या टी20 विश्वचषकात पुनरागमनासाठी सज्ज असेल.

यंदाच्या टी20 विश्वचषकात अमेरिकेनं पहिल्याच सामन्यात कॅनडाचा धुव्वा उडवला आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारत चमकदार कामगिरी केली. परंतु तिसऱ्या सामन्यात अमेरिकेला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारताविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेनं जोरदार टक्कर दिली. अमेरिका ग्रुप-अ मध्ये समाविष्ट आहे. ग्रुप-अच्या  गुणतालिकेत भारत 6 गुणांसह शीर्ष स्थानी आहे. तर अमेरिका 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. यादरम्यान त्यांचा नेट रनरेट (+0.127) आहे. तर पाकिस्तान 2 गुणांसह तिसऱ्या स्थानी असून त्यांचा नेट रनरेट (+0.191) आहे.

अमेरिका विरुद्ध आयर्लंड या सामन्यात आयर्लंडनं विजय मिळवला, तर पाकिस्तानला त्यांच्या पुढच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल आणि नंतरच पाकिस्तानसाठी सुपर मध्ये क्वालिफाय होण्याचे दरवाजे पूर्णपणे उघडणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या सर्व आशा सामन्यावर अवलंबून आहेत. अमेरिकेनं या सामन्यात आयर्लंडचा धुव्वा उडवला तर 6 गुणांसह अमेरिका सुपर 8 साठी क्वालिफाय करणार आहे. या सामन्यात जरी पावसानं खोळंबा घातला तरी दोन्ही संघांना 1-1 गुण मिळेल आणि अमेरिका सुपर 8 साठी पात्र राहिल.

महत्त्वाच्या बातम्या-

कॅनडाविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे सरावसत्र रद्द! जाणून घ्या कारण
कोण वीरेंद्र सेहवाग…? शाकिब अल हसनचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल
भारतीय संघास धक्का! सुपर-8 फेरी पूर्वी टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू मायदेशी परतणार

  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---