टी20 विश्वचषकासाठी (t20 world cup) भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. परंतु काही खेळाडू अद्दाप भारतीय संघासोबत सहभागी झाले नाहीत. भारताच्या काही युवा खेळाडूंसाठी हा पहिलाच टी20 विश्वचषक आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक (Wicket keeper) फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) दीड वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करतोय.
रिषभ पंत हा खूप मोठ्या भीषण अपघातातून वाचला आहे. त्याचं पुनरागमन हे भारतीय संघासाठी खूप मोलाचं ठरणार आहे. पंत आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा (Delhi Capitals) कर्णधार होता. भीषण अपघातानंतर पंत दिल्लीकडून पहिला सामना खेळला. याच सामन्यात पंतनं दीड वर्षानंतर पुनरागमन केलं. त्यानं या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली. पंतनं या हंगामात 155.40 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत 446 ठोकल्या. ज्यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
स्टार स्पोर्ट्सनं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये रिषभ पंतला असे म्हणाला की, “त्या दिवसापासून हृदयात एक तळमळ बाकी आहे. स्वत:च्या पायावर उभा राहिलोय पण भारतासाठी पुन्हा उभं राहणं अजून बाकी आहे.”
Ready. Able. Determined! 💪🏻
From adversity to triumph, @RishabhPant17‘s journey to the ICC Men’s T20 World Cup is a testament of resilience and determination. Join him as he ignites the spirit of a nation at 7.52 PM! 🇮🇳
Watch the swashbuckling wicket-keeper take on Ireland on… pic.twitter.com/lffk5OaJSK
— Star Sports (@StarSportsIndia) May 29, 2024
यंदाचा टी20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात खेळला जाणार आहे. टी20 विश्वचषकाची सुरुवात येत्या 2 जूनपासून होणार आहे. परंतु भारतीय संघ त्यांचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारतीय संघ त्यांचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याची क्रिकेटचे चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासोबत ‘हा’ दिग्गज खेळाडू झाला सहभागी
टी20 विश्वचषकात ‘हे’ 5 युवा खेळाडू घालतील धुमाकुळ
टी20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर परतला फाॅर्ममध्ये केवळ 20 चेंडूत झळकावले अर्धशतक