आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जागतिक दर्जाच्या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी माहिती दिली आहे. तसेच टी-20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.
याबरोबरच या स्पर्धेसाठी भारताला कॅनडा, अमेरिका, पाकिस्तान आणि आयर्लंडसह अ गटात ठेवण्यात आले आहे. तर 1 जूनपासून ही स्पर्धा सुरू होणार असेल, तर सर्व संघांना एक महिना अगोदर 1 मेपर्यंत संघाची घोषणा करावी लागणार आहे. याशिवाय बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे सांगितले होते की, रोहित शर्मा टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
अशातच आता भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर त्यात 15 खेळाडूंची निवड करणे खूप कठीण जाणार आहे. कराण युवा किंवा अनुभवी खेळाडूंना संधी द्यायची की नाही हा सर्वात मोठा प्रश्न निवड समिती समोर असणार आहे. विराट कोहली, केएल राहुल ही अशी काही नावे आहेत ज्यांचा खेळ सस्पेन्समध्ये आहे. तर टिलक वर्मा, रिंकू सिंग या तरुणांनी खूप प्रभावित केले आहे. अशा परिस्थितीत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
Jay Shah Said about Rishabh Pant :-
"Rishabh Pant is batting well, he is keeping well. We will declare him fit very soon. If he can play the T20 World Cup 2024 for us, that will be a big thing for us. He is a big asset for us".
[ Source – PTI ] pic.twitter.com/LyQBOYTCbV
— Jay Cricket. (@Jay_Cricket18) March 11, 2024
दरम्यान, आता या स्पर्धेत रोहित शर्मा कर्णधार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कारण जय शाह यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते की, भारतीय संघ दुर्दैवाने एकदिवसीय विश्वचषकात विजेतेपद मिळवू शकला नाही. पण त्यानंतर जय शहा म्हणाले होते की, टीम इंडिया यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित होणाऱ्या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद निश्चितच विजयी होईल.
भारतीय संघाचे ग्रुप स्टेजचे वेळापत्रक
5 जून- भारत विरुद्ध आयर्लंड (न्यूयॉर्क)
9 जून- भारत विरुद्ध पाकिस्तान (न्यूयॉर्क)
12 जून- भारत विरुद्ध अमेरिका (न्यूयॉर्क)
15 जून- भारत विरुद्ध कॅनडा (फ्लोरिडा)
टी-20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ऋषभ पंत/संजू सॅमसन, रिंकू सिंग, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, मोहम्मद सिराह, जसप्रीत बुमराह , अर्शदीप सिंग.
महत्त्वाच्या बातम्या-
- रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेचं खणखणीत अर्धशतक, अन् टीकाकारांना चोख उत्तर
- IPL 2024 : ‘आला रे आला’, हार्दिक पांड्याचे मुंबई इंडियन्सच्या कॅपमध्ये जंगी स्वागत, पाहा व्हिडिओ