रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने वानखेडे स्टेडियममध्ये खणखणीत चौकार ठोकून अफलातून अर्धशतक ठोकलं आहे. रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. मात्र रहाणेला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामळे रहाणेवर चौफेर टीका करण्यात येत होती. मात्र रहाणे अंतिम फेरीत अर्धशतक ठोकून टीकाकाराना चोख उत्तर दिलं आहे.
याबरोबरच, अंतिम सामन्यात मुंबईकडून शार्दूल ठाकुर याच्यानंतर अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. तसेच या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील रहाणेचं हे दुसरं अर्धशतक ठरलं. अजिंक्य रहाणे याने 88 चेंडूत 4 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने हे अर्धशतक झळकावलं. अजिंक्यच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे 37 वं अर्धशतक ठरलं. रहाणेने 58 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं आहे.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1767142887740080229
दरम्यान अजिंक्य रहाणे आणि सरफराज खान याचा छोटा भाऊ मुशीर खान या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली आहे. मुंबईला भूपेन ललवाणी याच्या रुपाने दुसरा झटका लागला. ललवाणी 18 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे मुंबईची स्थिती 2 बाद 34 अशी झाली. मात्र त्यानंतर अजिंक्य आणि मुशीर या दोघांनी मुंबईचा डाव सावरला आणि तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.
महत्त्वाच्या बातम्या-