---Advertisement---

न्यूयॉर्कमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसला ‘हिटमॅन’! इंस्टाग्रामवर शेअर केले मजेशीर फोटो

rohit sharma at newyork hotel
---Advertisement---

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी20 विश्वचषकासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आपला सराव सामना खेळला, ज्यामध्ये भारताने 60 धावांनी विजय मिळवला. आता भारत विरुद्ध आर्यलँड सामन्यापूर्वी रोहित शर्मा मस्तीच्या मूड मध्ये दिसून आला. रोहितने न्यूयाॅर्क येथील एका रेस्टाॅरंट भेट दिली. दरम्यान तेथील काही मजेशीर फोटो रोहितने शेअर केले आहेत. यावर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रोहितने इंस्टाग्रामवर चार फोटो शेअर केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, बिग ॲपलमध्ये बिग मूड्स. रोहितच्या या फोटोंना अल्पावधीतच 10 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहेत. अनेक चाहत्यांनी तिथे कमेंट देखील केल्या. अविनाश नावाच्या युजरने लिहिले, “भाऊ, एक छान कप बनवा फोटोंमध्ये रोहित पांढरा शर्ट घातलेला दिसत आहे.” त्याने ऑलिव्ह रंगाची कॅप घातली आहे. यासोबतच त्याने काळा चष्माही घातला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

बांग्लादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात रोहितला विशेष काही करता आले नाही. त्याने 19 चेंडूंचा सामना करत 23 धावा केल्या. यादरम्यान 2 चौकार आणि 1 षटकार मारला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ केवळ 122 धावा करू शकला. भारताकडून शिवम दुबे आणि अर्शदीप सिंगने 2-2 बळी घेतले. जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली.

भारतीय संघाचा पहिला सामना उद्या (5जून) आर्यलँड विरुद्ध होणार आहे. तर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. तिसरा सामना 12 जून रोजी अमेरिका विरुद्ध होणार आहे. भारताचे तीनही सामने न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होणार आहेत.

महत्तवाच्या बातम्या-

अफगाणिस्तानची टी20 विश्वचषकाला धडाकेबाज सुरुवात! पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय
पाकिस्तानच्या हसन अलीचं पुन्हा एकदा हसं! विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना झाली दुखापत; पाहा VIDEO
आयर्लंडला हलक्यात घेणं परवडणारं नाही, टीम इंडियासाठी ‘हे’ 5 खेळाडू ठरू शकतात धोकादायक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---