---Advertisement---

“चार-पाच दिवसांत पाकिस्तान निर्णय बदलणार, सामना होणारच”, भारताच्या माजी खेळाडूचे खडेबोल

On: बुधवार, फेब्रुवारी 4, 2026 3:19 PM
---Advertisement---

जेव्हापासून पाकिस्तान क्रिकेटने भारताच्या टी२० विश्वचषकातील सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून त्यांच्यावर चोहोबाजूंनी माजी क्रिकेटपटूंनी टीका सुरू केल्या आहेत. आता त्यामध्ये भारताच्या माजी विश्वविजेत्या क्रिकेटपटूने सहभाग घेतला आहे. त्याच्यामते, भारत-पाकिस्तान सामना हा ठरलेल्या वेळेप्रमाणे होणार आहे.

क्रिकेटविश्वात येत्या ७ फेब्रुवारीपासून पुरूषांचा टी२० विश्वचषक सुरू होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोघेही एकाच गटात असल्याने ते १५ फेब्रुवारीला समोरा-समोर येणार होते. हा सामना श्रीलंकेतील कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. याच सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे. यामुळे त्यांच्यावर टीका केल्या जात आहेत.

भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने त्याच्या युट्युब चॅनलमार्फत हा सामना होणारच असे विधान केले आहे. त्यामध्ये त्याने म्हटले, “१०० टक्के सामना होणारच. मला वाटते पाकिस्तान चार-पाच दिवसात त्यांच्या ठरलेल्या निर्णयावर माघार घेईल. सर्व बाजूंनी विचार केला तर ब्रॉडकास्टर्स, आयसीसी यांना त्याचे अधिक नुकसान होईल. त्यामुळे आयसीसी सदस्यासोबतच्या मिटींगमध्ये पाकिस्तानवर अधिक दबाव येईल. कदाचित पीएसएलच्या खेळाडूंना मान्यताही मिळणार नाही.”

अश्विनने हे पूर्णपणे खेळ भावनेच्या विरूद्ध असल्याचेही म्हटले. याबाबत तो म्हणाला, “भारत-पाकिस्तान सामना न्यूट्रल वेन्यूवर आहे. त्यामुळे ठिकाणाचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे आम्ही एका विशिष्ट संघाविरुद्ध खेळणार नाही, हे योग्य नाही.”

यावेळी अश्विनने आयसीसी पुरूष १९ वर्षाखालील संघाचे उदाहरण दिले. त्याविषयी अधिक माहिती देताना तो म्हणाला, ” भावनेच्या भरात घेतलेले निर्णय योग्य नाही ठरत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आधी विचार करावा की आपल्याला चांगला खेळ करत पुढील फेरीसाठी पात्र ठरायचे आहे आणि विश्वचषक जिंकायचा आहे.”

“समजा संघाला पुढील फेरीत पोहोचण्यासाठी ३३ षटकाच लक्ष्य पूर्ण करायचे आहे. ते तुम्ही ३३ षटकात नाही करू शकला तर तुम्ही पुढे जाणार नाहीत. त्यावेळी ते २५० धावा कशा बनवतील हा विचार करणे आवश्यक आहे”, असेही अश्विनने त्याच्या चॅनलवरील कार्यक्रमात म्हटले.

१९ वर्षाखालील स्पर्धेत भारत-पाकिस्तान एक फेब्रुवारीला खेळले. त्यात भारताने पाकिस्तानसमोर २५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तो सामना भारताने ५८ धावांनी जिंकला होता.

“पाकिस्तान अंतिम फेरीत पोहचतील अशी आशा आहे, मात्र त्यांचा सर्वात मोठा शत्रू त्यांचे स्वत:चे विचार आहेत”, असेही अश्विन पुढे म्हणाला.

आयसीसीने पाकिस्तानला अधिक विचार करण्यास सांगितले आहे. त्यांनीही हे चाहते आणि खेळाच्या हिताविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांच्या सरकारच्या मंजुरीनंतर घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---