---Advertisement---

T20 WC26: ऑस्ट्रेलियासाठी मोठा झटका! आधी कमिन्स, आता ‘हा’ वेगवान गोलंदाजही अनफिट

On: सोमवार, फेब्रुवारी 2, 2026 11:46 AM
---Advertisement---

आगामी टी२० विश्वचषक २०२६ सुरू झालाही नाही की खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र मात्र सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला याचा अधिक फटका बसल्याचे दिसत आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. आता आणखी एक गोलंदाज स्पर्धेच्या सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार, असे वृत्त समोर येत आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आगामी टी२० विश्वचषकाच्या सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. तो पूर्णपणे फिट नसल्याने त्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

हेझलवूड हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ऍशेस मालिकेतील काही सामन्यांना मुकला होता. तेव्हा तो टी२० विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट होईल अशी अपेक्षा होती. त्यानंतर त्याला रिहॅबिलिटेशनमध्ये (पूनर्वसन प्रक्रिया) ऍकलिसची (Achilles) समस्या झाली. ज्यामुळे तो पूर्णपणे फिट झाला नाही.

“आम्हाला वाटले घरच्या वातावरणात हेझलवूड लवकर ठीक होईल, मात्र तसे झाले नाही. तो आता कधी या स्पर्धेसाठी पोहोचणार हे निश्चित नाही”, असे संघनिवड अधिकारी टोनी डोडेमेड यांनी सांगितले

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आधीच निवृत्ती जाहीर केली असून कमिन्सही दुखापतीमुळे बाहेर आहे. आता हेझलवूडही पूर्णपणे फिट नाही. यामुळे संघाचे तिन्ही प्रमुख वेगवान गोलंदाज या आयसीसी स्पर्धेत खेळणार नाही किंवा मुकणार असल्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. हेझलवूडच्या जागी संघात सीन ॲबॉटला घेतले आहे. तसा तो संघात ट्रॅव्हलिंग रिजर्व म्हणून होताच.

ऑस्ट्रेलिया लवकरच श्रीलंकेत पोहोचणार असून तेथे त्यांचे लीग सामने आहेत. तेव्हा हेजलवूड संघासोबत नसणार. तो सिडनीत थांबणार असून रिहॅबमध्ये त्याचा फिटनेसवर काम करणार आहे. तसेच ग्लेन मॅक्सवेल, नॅथन एलिस आणि टीम डेविड लवकरच संघाशी जोडले जाणार आहेत. ते पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेला मुकले होते. विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलिया नेदरलॅंड्सविरुद्ध वॉर्म-अप सामना खेळणार आहे. त्यांनतर त्यांचा पहिला सामना ११ फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्ध आहे.

सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. तेथे तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात असून त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे विश्वचषकातील काहीच खेळाडूंचा सहभाग आहे. ती मालिका संपली की ते श्रीलंकेला रवाना होणार आहेत.

२०२६ टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ-
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, टिम डेविड, बेन ड्वार्शुइस, कॅमेरुन ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मॅट कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट रेनशॉ, मार्कस स्टोइनिस, ॲडम झंपा, सीन ॲबॉट (ट्रॅव्हलिंग रिजर्व)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---