टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2024 टी20 विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघानं विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. टी20 विश्वचषक स्पर्धेची ही 9वी आवृत्ती होती. आता चाहत्यांना पुढील टी20 विश्वचषकाची उत्सुकता लागली आहे. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला पुढील विश्वचषकाबद्दलची सर्व माहिती सांगणार आहोत.
पुढचा टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळला जाणार आहे. आयसीसीनं 2026 च्या टी20 विश्वचषकासाठी फेब्रुवारी ते मार्चची विंडो दिली आहे. या विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. 2026 टी20 विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत खेळला जाईल. दोन्ही देश या स्पर्धेचं संयुक्तपणे आयोजन करणार आहेत. 2024 टी20 विश्वचषकातील सुपर-8 संघ 2026 टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. यजमान देश असल्यामुळे भारत आणि श्रीलंका आधीच क्वालिफाय झाले होते. 2026 टी20 विश्वचषकातील बहुतांश सामने भारतात खेळले जातील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचा संघही प्रथमच भारतात येणार आहे.
2026 टी20 विश्वचषक भारत आणि श्रीलंकेमध्ये आयोजित केला जाणार आहे. हा विश्वचषक फेब्रुवारीमध्ये सुरू होऊ शकते. या टी20 विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. यापैकी 12 संघ पात्र ठरले असून, 8 संघ पात्रता फेरीतून येतील. 20 संघांमध्ये एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. असं असली तरी अद्याप विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर झालेलं नाही.
2026 टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरलेले देश – भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड आणि पाकिस्तान.
महत्त्वाच्या बातम्या –
1983 ते 2024…विश्वचषक जिंकणाऱ्या सर्व भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, एकाचं नाव तुम्ही कधीच ऐकलं नसेल!
मोठी बातमी: रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
“आता मी बेरोजगार झालो”, राहुल द्रविड यांनी जाता-जाता दिली भावनिक प्रतिक्रिया