आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) आज (5 जून) रोजी भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये आठवा सामना खेळला गेला. न्यूयाॅर्कमध्ये असलेल्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. त्यामध्ये भारतानं 8 विकेट्सनं आयर्लंड संघाचा धुव्वा उडवत या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.
भारतापुढे अवघ्या 97 धावांचं आव्हान होत. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी सलामी दिली. परंतु विराट कोहली जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. कोहली एका धावेवरती तंबूत परतला. त्यानंतर रिषभ पंत आणि रोहित शर्मा यांनी फटकेबाजी करत संघाला विजयाच्या दिशेनं खेचलं. रोहितनं या सामन्यात 37 चेंडूत 52 धावांची खेळी खेळली.
कर्णधार रोहित शर्मा अर्धशतक ठोकल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाला. तर पंतन 26 चेंडूत 36 धावांची आक्रमक खेळी खेळून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. मार्क एडेयरनं आयर्लंड संघासाठी 1 विकेट घेतली. परंतु आयर्लंडचा अन्य कोणताही गोलंदाज यश मिळवू शकला नाही.
भारतानं टाॅस जिंकून आयर्लंड संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्याबदल्यात आयर्लंडनं अवघ्या 97 धावांच करु शकलं. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडकडून गॅरेथ डेलेनीनं सर्वाधिक 14 चेंडूत 26 धावा केल्या. जोशुआ लिटलनं 14 धावांच योगदानं दिलं. भारताच्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यापुढे आयर्लंड संघानं गुडघे टेकवले. आयर्लंड संघानं सर्वबाद 96 धावसंख्या केली. भारताकडून गोलंदाजी करताना अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी 2-2 विकेट्स घेत संघाला मोलाचं योगदान दिलं.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक) , सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
आयर्लंड- पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेयर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर आझम एमएस धोनी नाही! पाकिस्तानच्या अहमद शहजादनं दिलं तिखट उत्तर
भारताच्या गोलंदाजीपुढे आयर्लंडचे खेळाडू ढेपाळले! भारतासमोर अवघ्या 97 धावांचं आव्हान
भारतानं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11