आयसीसी टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत भारताच पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. भारतीय चाहते मागील टी20 विश्वचषकाची आठवण विसरले नसतील, तो पराभव अजूनही भारताच्या पचनी पडला नाही. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भारताचा कर्णधार रोहित शर्मा नेटमध्ये खास सराव करत आहे.
मेलबर्नमध्ये पोहोचल्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने उजव्या-डाव्या थ्रो डाऊन थ्रोअर्सचा सामना केला. रोहितच्या कामगिरीवर एकदा लक्ष दिले तर तो डाव्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध बहुतेकवेळा अपयशी ठरला आहे. तशीच स्थिती भारताच्या संपूर्ण वरच्या फळीची आहे. पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी पाहिली तर त्यांच्याकडे शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरीस रौफ यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध फलंदाजी करणे कधीही अवघडच आहे. नुकतेच सराव सामन्यात आफ्रिदीच्या यॉर्करने अफगाणिस्तानचा रहमानुल्लाह गुरबाज हा जखमी झाला होता. आफ्रिदीने दुखापतीतून पुनरागमन केले आहे. तो सध्या पाकिस्तानचा क्रमांक एकचा वेगवान गोलंदाज आहे. तसेच तो पॉवरप्लेमध्ये विकेट्स काढण्यात उत्तम आहे.
टी20 विश्वचषक 2021च्या स्पर्धेत जेव्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने आले होते तेव्हा भारताचे दोन्ही सलामीवीर लवकरच तंबूत परतसे होते. त्या दोन्ही विकेट आफ्रिदीनेच काढल्या होत्या. रोहितने शाहीनच्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर आपली विकेट गमावली होती. त्यानंतर आशिया चषक 2022मध्येही तो खास काही करू शकला नाही. तसेच रोहित मागील काही काळापासून आऊट ऑफ फॉर्म दिसत आहे. केएल राहुल आणि विराट कोहली हे फॉर्ममध्ये आले आहेत. यामुळे रोहितला या स्पर्धेत संघाला मजबूत स्थितीत आणण्यासाठी फॉर्ममध्ये परतावे लागेल.
Rohit Sharma at the nets.Throw downs – left and right arm pacers #T20WorldCup #INDvsPAK @ImRo45 #MCG pic.twitter.com/mcVgLJaCGi
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) October 21, 2022
रोहित आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याचा हा आठवा टी20 विश्वचषक आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 33 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 8 अर्धशतके ठोकली आहेत. त्यामुळे तो टी20 विश्वचषकात सर्वाधिक (847) धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदानावरच नव्हेतर मैदानाबाहेरही ‘किंग’ आहे कोहली! चाहत्यांना दिली अशी वागणूक; पाहा व्हिडिओ
सलामीवीरांनो सावधान! आफ्रिदीच्या यॉर्करने अफगाणिस्तानच्या फलंदाजाला केलंय जखमी, माजी प्रशिक्षक म्हणतोय…