ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकातून (T20 World Cup) भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला या महत्वाच्या स्पर्धेस मुकावे लागणार आहे. यामुळे त्याची जागा कोण घेणार अशा चर्चांना उधान आले आहे. नुकतेच भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1ने पराभूत केले आहे. यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने बुमराहबाबत महत्वाचे विधान केले आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “संघात सध्या खूप खेळाडू असे आहेत ज्यांना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव नाही. यामुळे आम्ही तेथे लवकर जाणार आहोत. पर्थच्या खेळपट्टीवर सराव करत तेथे चेंडू कशाप्रकारे उसळी घेतो हे निरक्षण करून त्याबाबत नियोजन करणार आहोत. त्यासाठी आम्ही काही अभ्यास सामन्यांचे आयोजन केले आहे. बुमराहचे संघात नसणे ही मोठी बाब आहे, मात्र काही खेळाडू त्याची जागा घेण्याच्या शर्यतीत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यानंतरच आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत.”
“एका संघाच्या रूपाने आम्ही आधीच म्हटले होते परिणाम काहीही असो त्यामध्ये सुधारणा नेहमी करत राहणार आहोत. आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत,” असेही रोहितने पुढे म्हटले आहे.
रोहित म्हणाला, “चिंतेचा विषय हा आहे की आम्हाला गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. पॉवरप्ले, मिडल ओव्हर्स (मधले षटक) आणि डेथ ओव्हर्समध्ये कोणते पर्याय मिळू शकतात याबाबतही विचार करणार आहोत. आम्ही सराव सामने जगातील दोन सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळणार आहोत यासाठी आमची कामगिरी चांगली होईल अशा पद्धतीने खेळण्याचा हेतू आाहे.”
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या चेंडू उसळी घेणाऱ्या असल्याने वेगवान गोलंदाजांसाठी त्या पुरक ठरतात. अशातच भारताकडे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचे संघात नसणे ही मोठी चिंताजनक बाब आहे. भारताने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेचा टी20 मालिकांमध्ये पराभव केला असला तरी गोलंदाजांनी वाईट कामगिरी केली आहे. विश्वचषकासाठीच्या भारताच्या मुख्य संघात मोहम्मद शमी याचा समावेश असून तो ही एक चांगला पर्याय भारताकडे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषक 2022: अबब, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार तीन सराव सामने!
गोलंदाजांनी आणलीये रोहितवर डोकं धरायची वेळ! डेथ ओव्हर्समध्ये मिळतोय मोक्कार चोप






