Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी20 विश्वचषक: भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व सामन्यांचा थरार जाणून घ्या एकाच क्लिकवर

टी20 विश्वचषक: भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व सामन्यांचा थरार जाणून घ्या एकाच क्लिकवर

October 22, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
virat kohli shaheen afridi

Photo Courtesy : bcci.tv


टी२० विश्वचषक २०२२ (T20 World Cup)मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ आ़ॅक्टोबरला खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर सर्वांच्या नजरा लागून आहेत. आतापर्यंत पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी२० वर्ल्डकप मध्ये एकूण सहा सामने खेळले गेलेत. या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यात भारताच पारडं जड होत तर एका सामन्यात पाकिस्तानने भारताचा धुव्वा उडवलेला. भारत आणि पाकिस्तान यांच मैदानात असलेलं वैर जगजाहीर आहे.

पुन्हा एकदा हे शेजारी संघ टी२० वर्ल्ड कप २०२२मध्ये समोरा-समोर येणार आहेत. २३ऑक्टोबरला मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या महासामन्यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. या ब्लॉकबस्टर सामन्यात भारताची धुरा रोहीत शर्मा सांभाळणार असून पाकिस्तान संघाची कमान बाबर आझम याच्या हाती सोपवली गेली आहे. आत्तापर्यंत पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी२० वर्ल्डकप मध्ये एकूण सहा सामने खेळले गेलेत. या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यात भारताच पारड जड होत तर एका सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केलेला. या सामन्यांची झलक पुन्हा सविस्तरपणे पाहूयात-

१. २००७ वर्ल्ड कप ग्रुप सामना-
टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला वहिला सामना २००७ मध्ये खेळला गेलेला. दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत ९ गड्यांच्या मोबदल्यात १४१ धावा केलेल्या. त्याला उत्तर देताना पाकिस्तानने देखील ७ गडी गमावून १४१ धावा बनवलेल्या. या बरोबरीत सुटलेल्या सामन्याचा निकाल बॉल-आऊटच्या आधारे लागला. ज्यात भारताने ३-० ने बाजी मारलेली. भारताच्या वतीने हरभजन सिंह, विरेंद्र सेहवाग आणि रॉबिन उथप्पा यांनी स्टंप्सवर अचुक नेम धरत बेल्स उडवल्या. याचे उत्तर देण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानी संघाकडून शाहिद आफ्रीदी, उमर गुल व यासिर अराफत यांनी बॉल फेकला मात्र कुणाचाही बॉल स्टंप उडवू शकला नाही.

२. २००७ वर्ल्ड कप अंतिम सामना-
हा सामना टी-२० विश्वचषक इतिहासातला सर्वात मोठा सामना समजला जातो. या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात १५७/५ अशी धावसंख्या उभारली. यात गौतम गंभीरच्या ५४ चेंडूत बनवलेल्या ७५ धावांचा मौल्यवान वाटा होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना ७७ धावांवर ६ गडी गमावले. मात्र परत एकदा मिसबाह उल हकने डाव सांभाळत पाकिस्तान संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. पण शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर जोगिंदर शर्माने त्याला झेलबाद करत भारताला आठवणीतला विजय मिळवून दिला. हा सामना भारताने अवघ्या ५ धावांनी जिंकला आणि टी20 विश्वचषकाचा पहिला चॅम्पियन ठरला.

३. २०१२ वर्ल्ड कप –
या विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान पाच वर्षानंतर समोरा-समोर आलेले. श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना त्यांचा डाव १२८ धावांवर गडगडला. या सामन्यात पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा शोएब मलिक (२८) याने बनवलेल्या. या छोट्या धावसंख्येचा पाठलाग १७ षटकांमध्येच पुर्ण केलेला ज्यात विराट कोहलीच्या नाबाद ७८ धावांचा समावेश होता.

४. २०१४ वर्ल्ड कप –
दोन वर्षांनंतर २०१४ मध्ये पुन्हा एकदा हे पारंपारिक विरोधक संघ एकमेकांना भिडले. बांगलादेशच्या ढाकामध्ये आयोजित केलेल्या या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत ७ गड्यांच्या मोबदल्यात १३० धावा केलेल्या. ज्यात उमर अकमलने सर्वाधिक ३३ व अहमद शहजाद याने २२ धावा बनवलेल्या. भारताने १८.३ षटकात ३ गडी गमावत हे लक्ष्य गाठलं. यात विराट कोहलीने ३६ व सुरेश रैना याने ३५ धावांच योगदान दिलेलं.

५.२०१६ वर्ल्ड कप –
२०१६ चा टी-२० वर्ल्ड कप भारतात आयोजित करण्यात आलेला. ईडन गार्डन्सच्या मैदानावर भारत विरूद्ध पाकिस्तान हा सुपर-१० चा सामना खेळवला गेलेला. पावसाचं सावट असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ५ गडी गमावत १८ षटकांमध्ये ११८ धावा केलेल्या. या धावसंख्याचा पाठलाग करताना भारताने १५.५ षटकात ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली नाबाद ५५ धावा करत सामनावीर ठरलेला.

६.२०२१ वर्ल्ड कप –
भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20 विश्वचषकातील शेवटचा सामना मागच्यावर्षी दुबई येथे झालेला. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत ७ गडी गमावत १५१ धावा केलेल्या. यात विराट कोहलीने ५७ व रिषभ पंत याने ३७ धावांच बहुमूल्य योगदान केलेलं. पाकिस्तानच्या शाहीन अफ्रिदीने या सामन्यात ३ गडी बाद करत भारताच्या फलंदाजीचं कंबर मोडलं. या धावसंख्येचा पाठलाग पाकिस्तानच्या फलंदाजांनी अगदी सहजपणे केला. त्यांनी एकही गडी न गमवता १५२ धावांच आव्हान १७.५ षटकात पूर्ण केलं. यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने ७९ व कर्णधार बाबर आझमने नाबाद ६८ धावा चोपल्या. विश्वचषकामध्ये पाकिस्तानचा भारताविरूद्ध हा पहिलाच विजय होता. हा सामना भारताने १० विकेट्सने गमावला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
AUS vs NZ | कॉनवेच्या वादळी खेळीमुळे विराटला तोटा, खास यादीत महत्वाचा बदल
कॉनवेने धरलाय यशाचा मार्ग! 92 धावांच्या लाजवाब खेळीने सोडलेय विराट-बाबरला मागे


Next Post
Glenn-Phillips

अफलातून! न्यूझीलंडच्या पठ्ठ्याने चित्त्याच्या चपळाईने झेल घेत स्टॉयनिसला धाडलं तंबूत, व्हिडिओ पाहिला का?

Photo Courtesy: Twitter/ICC

विश्वचषकाच्या सलामीलाच यजमान ऑस्ट्रेलिया पस्त! न्यूझीलंडचा 89 धावांनी दणदणीत विजय

ishan kishan

देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय इशान किशन, ओडिसाविरुद्ध केलेले शतक ठरले ऐतिहासिक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143