ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup)शनिवारी (22 ऑक्टोबर) दोन सुपर 12चे सामने रंगले. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 2021च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा बदला ऑस्ट्रेलियाकडून घेतला. सिडनीमध्ये झालेला हा सामना यजमान संघाने 89 धावांनी गमावला. दुसरा सामना इंग्लंडने जिंकला. पर्थमध्ये झालेला हा सामना अफगाणिस्तानने 5 विकेट्सने गमावला. या दोन्ही सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने तर 12 वर्ष जुना केविन पीटरसन याचा विक्रम मोडला आहे.
इंग्लंडचा कर्णधार-विकेटकीपर जोस बटलर (Jos Buttler) याने अफगाणिस्तानविरुद्ध 18 धावा केल्या. त्याने सलामीला येताना 18 चेंडूत 3 चौकार खेचत ही खेळी केली. यावेळी त्याने 7 धावा करताच तो महत्वाच्या यादीत सामील झाला आणि संघसहकारी दिग्गज फलंदाज केविन पीटरसन (Kevin Pietersen) याचा विक्रम मोडला. बटलरचा हा कारकिर्दीतील पाचवा टी20 विश्वचषक आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याआधी त्याने टी20 विश्वचषकाच्या 21 सामन्यात 574 धावा केल्या होत्या. तर पीटरसनने 2007-2010 दरम्यान टी20 विश्वचषकाचे 15 सामने खेळताना 580 धावा केल्या. हा विक्रम बटलरने मोडला आहे. त्याने आतापर्यंत 22 सामने खेळताना 592 धावा केल्या आहेत.
टी20 विश्वचषक सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बलटरने पीटरसनला मागे टाकले आहे. याबरोबरच तो टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा एकमेव खेळाडू ठरला. हे करताना मात्र भारताची माजी अष्टपैलू युवराज सिंग याचा विक्रम थोडक्यात वाचला पण तो इंग्लंडच्या पुढच्या सामन्यात मोडला जाणार आहे. तो विक्रम म्हणजे टी20 विश्वचषक सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बलटरच्या पुढे युवराज (593) आहे. तसेच टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये श्रीलंकेचा माजी सलामीवीर माहेला जयर्धने 1016 धावा करत पहिल्या स्थानावर कायम आहे.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सॅम करन याच्या माऱ्यासमोर 19.4 षटकात सर्व विकेट्स गमावत 112 धावसंख्याच उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 5 विकेट्स गमावत 18.1 षटकात 113 धावा केल्या. यामध्ये इंग्लंडकडून लियाम लिविंगस्टोन याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 21 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान वेगळाचं! भारतावर पडलायं भारी, एकदा आकडेवारी पाहाच
‘त्या’ चार चेंडूंनी बदलले पानटपरीवाल्याच्या मुलाचे नशीब, विश्वचषक तर जिंकून दिलाच शिवाय केली देशाची अशाप्रकारे सेवा