---Advertisement---

नशीब बलवत्तर! एकाच चेंडूवर ३ वेळा धावबाद होण्यापासून फलंदाज, बघा टी२० विश्वचषकातील ‘कॉमेडी एरर’

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 11:55 AM
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानावर सतत अशा गोष्टी घडताना दिसतात, ज्यावर विश्वास ठेवणे जड जाते. युएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२१ मधील एका सामन्यात असाच काहीसा प्रसंग पाहायला मिळाला आहे. एक फलंदाज एक नव्हे, दोन नव्हे, चक्क तीन वेळा धावबाद होण्यापासून वाचला आहे. अर्धा संघ मिळूनही त्याला धावबाद करू शकला नाही. हा कधीही न पाहिलेला प्रसंग घडला आहे, शारजाह येथे नामबिया विरुद्ध आयर्लंड यांच्यात झालेल्या ११ व्या सामन्यात.

शुक्रवार रोजी (२२ ऑक्टोबर) झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने निर्धारित २० षटकांत ८ विकेट्सच्या नुकसानावर १२५ धावा केल्या होत्या. या डावादरम्यान अंतिम षटकात सिमी सिंग फलंदाजीला आला असताना हा प्रसंग घडला. यावेळी नामिबियाकडून डेविड विसे गोलंदाजी करत होता. त्याने षटकातील शेवटचा चेंडू स्लोवर चेंडू टाकला. यावर आयर्लंडचा फलंदाज सिमी सिंगने शॉट खेळला आणि तो धाव घेण्यासाठी पळाला.

परंतु चेंडू विसेच्या बाजूने गेला होता. त्याने त्वरित हा चेंडू पकडला आणि स्ट्राईकरच्या बाजूने चेंडू फेकून फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा थ्रो निशाण्यावर लागला नाही आणि चेंडू यष्टीमागील सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूच्या हाती गेला. त्या खेळाडूनेही पटकन चेंडू पकडला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने पकडला. चेंडू यष्टीरक्षकाकडे येत असल्याचे पाहूनही इकडे सिमी सिंग आपल्या सहकाऱ्यासोबत दुसरी धाव घेण्यासाठी पळत होता. सुदैवाने यष्टीरक्षकाला तो चेंडू वेळेत पकडता आला नाही आणि दुसऱ्यांदा तो धावबाद होता होता वाचला.

गमतीशीर बाब म्हणजे, इतक्यावरच हा नाट्यमय प्रसंग थांबला नाही. तर पुन्हा आयर्लंडच्या फलंदाजांनी जीवनदान मिळाल्याचे पाहून तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहून यष्टीरक्षकाने घाईत नॉन स्ट्राईकरच्या दिशेने चेंडू फेकला. यावेळी नॉन स्ट्राईककडे २ क्षेत्ररक्षक उभे होते. परंतु त्यांनाही फलंदाजाला धावबाद करण्यात यश आले नाही. अशाप्रकारे आयर्लंडच्या फलंदाजाला ३ वेळा जीवनदान मिळाले आणि सोबतच ३ अधिकच्या धावाही मिळाल्या.

https://www.instagram.com/reel/CVVGdKjlsAL/?utm_source=ig_web_button_share_sheet

दरम्यान या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने सलामीवीर पॉल स्टर्लिंगच्या ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर १२५ धावा फलकावर लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नामिबियाकडून कर्णधार गेहार्ड इरॅस्मसने सर्वाधिक नाबाद ५३ धावा केल्या होत्या. तसेच डेविस विसेने नाबाद २८ धावांचे योगदान दिले होते. याच्या जोरावर नामिबियाने १८.३ षटकातच ८ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

मल्टिटास्किंग माही! मेंटरसह धोनी टीम इंडियासाठी निभावतोय आणखी एक महत्त्वपूर्ण भूमिका; बीसीसीआयचा खुलासा

आजपासून रंगणार सुपर १२ फेरीतील सामन्यांचा महासंग्राम, वेस्ट इंडिजविरुद्ध जुना हिशोब बरोबर करेल इंग्लंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---