भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यध जय शहा यांच्या एका निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. त्याची सर्वाधिक झळ पाकिस्तान क्रिकेट बोर्डला पोहोचली आहे. शहा यांनी भारतीय पुरूष क्रिकेट संघ 2023च्या आशिया चषकासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही असे विधान केले. यामुळे पुढील आशिया चषकाचे आयोजन न्यूट्रल वेन्यूवर करणार आहे. यावरून पाकिस्तानकडूनही पलटवार केला जात आहे. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने तर 23 ऑक्टोबरला पाकिस्तानने भारताविरुद्धच खेळूच नये, असे म्हटले आहे.
झाले असे की आशिया चषकासाठी (Asia Cup) भारत पाकिस्तानचा दौरा नाही करणार असे शहा यांनी म्हटल्यावर पाकिस्तान क्रिकेट संघाने 2023च्या वनडे विश्वचषकासाठी भारतात जाऊ नये, असे मत पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी मांडले आहे.
त्यातच ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकात भारतविरुद्ध 23 ऑक्टोबरचा सामना पाकिस्तानने न खेळण्याचा सल्ला पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने दिला आहे. हा सल्ला माजी विकेटकीपर कामरान अकमल याने दिला आहे. त्याने म्हटले, “2023च्या आशिया चषकात पाकिस्तानचे यजमानपद गेले तर पाकिस्तानने भारताविरुद्ध कोणतेच सामने खेळले नाही पाहिजे.”
एआरवाय न्यूजशी बोलताना अकमल म्हणाला, “आशिया चषक 2023 ची स्पर्धा केवळ पाकिस्तामध्येच झाली पाहिजे आणि असे नाही झाले तर पाकिस्तानने भारताविरुद्ध कोणत्याच स्पर्धत खेळू नये. मग ती आयसीसी स्पर्धा असो वा आशियाई स्पर्धा किंवा 23 ऑक्टोबरचा सामना.”
“जय शहा यांचे विधान अंचबित करणारे होते. त्यांनी यावर्षी खेळल्या गेलेल्या आशिया चषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भाग घेतला होता. त्यामुळे त्यांनी राजकारण आणि खेळ हे दोन विषय वेगवेगळे ठेवले पाहिजेत,” असेही कामरानने पुढे म्हटले आहे.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत भारतीय क्रिकेट संघाच्या 2023 फ्युचर टूर प्रोग्रामबाबत महत्वाचे निर्णय घेतले. भारत 2023च्या आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाणार नाही हा निर्णय पण त्यापैकीच एक आहे. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या भविष्यातील खेळावर प्रश्न निर्माण झाले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! 61 चेंडूत नाबाद 118 धावा करणारा फलंदाज टी20 वर्ल्डकपमधून बाहेर, ऑस्ट्रेलियाला झटका
सचिनची विकेट गेल्यावर सेहवाग अंपायर शेजारी जाऊन बसला, असे काय घडले होते बेंगलोर कसोटीत?