---Advertisement---

T20 World Cup: विराटच्या विक्रमाची बरोबरी करणारा डेरिंगबाज सिकंदर! हॅट्रिक घेत इतिहासही घडवला

Sikandar-Raza
---Advertisement---

सध्या आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक आफ्रिका रीजन क्वालिफायर 2023 मधील सामने खेळले जात आहेत. यातील 13व्या सामन्यात रवांडा विरुद्ध झिम्बाब्वे संघ आमने-सामने होते. हा सामना झिम्बाब्वेने 144 धावांनी आपल्या नावावर केला. यासोबतच संघाचा कर्णधार सिकंदर रझा याने बॅट आणि चेंडू दोन्हीतून धमाकेदार प्रदर्शन केले. रझाने या सामन्यात आधी फलंदाजी करताना अर्धशतक ठोकले. त्यानंतर त्याने गोलंदाजी करताना हॅट्रिक घेऊन इतिहास घडवला. विशेष म्हणजे, रझाने दमदार गोलंदाजी करत विराट कोहली याच्या विक्रमाचीही बरोबरी केली.

रझाची फलंदाजी
रवांडाविरुद्ध खेळताना सिकंदर रझा (Sikandar Raza) याने आधी फलंदाजीतून धमाल केली. त्याने वादळी अंदाजात फलंदाजी करत अवघ्या 36 चेंडूत 58 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या खेळीत 4 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. रझाच्या शानदार खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्स गमावत 215 धावा केल्या होत्या.

हॅट्रिकने घडवला इतिहास
सिकंदर रझा याने फलंदाजीतून धमाल केल्यानंतर गोलंदाजीतूनही कमाल केली. रझाने या सामन्यात गोलंदाजी करताना 2.4 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 3 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. या तिन्ही विकेट्स त्याने सलग 3 चेंडूत घेतल्या. तसेच, तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा झिम्बाब्वेचा पहिला गोलंदाजही बनला.

विराटच्या विक्रमाची बरोबरी
सिकंदर रझा याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. रझाने सन 2023मध्ये सहाव्यांदा सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा कारनामा केला. झिम्बाब्वेचा अष्टपैलूने याबाबतीत विराट कोहली (Virat Kohli) याची बरोबरी केली. विराटनेही या वर्षी आतापर्यंत 6 वेळा सामनावीर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. (t20 world cup sikandar raza equals virat kohli massive record after taking hattrick against rwanda africa region qualifiers 2023)

हेही वाचा-
टी20 मालिकेत सूर्याच्या निशाण्यावर विराटचा महाविक्रम! मोडला तर बनेल ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
T20 World Cup 2024मध्ये भारतीय संघाचा कर्णधार पंड्या नकोच, झहीर खानने सुचवलं ‘हे’ नाव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---