टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या सुपर 12चे संघ निश्चित झाले आहेत. शुक्रवारी (21 ऑक्टोबर) वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड आणि झिम्बाब्वे विरुद्ध स्कॉटलंड हे दोन सामने खेळले गेले. यांमधून आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे दोन संघ सुपर 12मध्ये पोहोचले आहेत. यातील आयर्लंड इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्याशी सामना करणार आहे. दुसऱ्या गटात असून भारत, पाकिस्तान, नेदरलॅंड्स, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. यामध्ये दुसरा गट संकटात आला आहे. त्याला कारणच तसे आहे.
मागील काही सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचा संघ उत्तम कामगिरी करत आहे. मग तो वनडे असो वा टी20 त्यामध्ये त्यांचा एक खेळाडू मॅचविनरची भुमिका चांगल्यातऱ्हेने पार पाडत आहे. त्याचे नाव सिकंदर रझा (Sikandar Raza). त्याने विश्वचषकाच्या सुपर 12साठीच्या महत्वाच्या सामन्यातही स्फोटक फलंदाजी केली आहे. त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना 23 चेंडूत 40 धावा केल्या. या सर्वोत्तम खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकार खेचले. तसेच त्याने 4 षटके टाकताना 20 धावा देत एक विकेटही घेतली आहे. यामुळे तो सामनावीर ठरला. तसेच त्याचा हा यंदाच्या वर्षातील आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सहावा सामनावीर पुरस्कार ठरला आहे. यावरून त्याची कामगिरी किती विलक्षण आणि सामनाविजयी आहे हे लक्षात येते.
36 वर्षीय रझा 2022मध्ये चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 40.75च्या सरासरीने धावा कुटल्या आहेत. यावेळी त्याने 5 अर्धशतकांच्या मदतीने 652 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने आठवेळा 40+ धावा केल्या आहेत. तसेच 20 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने 2013मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20च्या कारकिर्दीला सुरूवात केली. तेव्हापासून त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरत आहे.
सिकंदर हा टी20 विश्वचषक 2022च्या पहिल्या फेरीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 3 सामन्यात 45.33च्या सरासरीने 136 धावा केल्या आहेत.
All round brilliance 👌
For contributions with bat and ball in Zimbabwe's historic win in the #T20WorldCup, Sikandar Raza is the @aramco Player of the Match 🌟 pic.twitter.com/fd9DIPZ6dE
— ICC (@ICC) October 21, 2022
झिम्बाब्वेने स्कॉटलंड विरुद्धचा सामना 5 विकेट्सने जिंकला. यामुळे त्यांनी टी20 विश्वचषकाच्या सुपर 12च्या शेवटच्या तिकीटावर आपला हक्क दाखवला आहे. ते भारत, पाकिस्तान यांच्या सुपर 12च्या दुसऱ्या गटात सामील झाले आहेत. त्यातच रझाची कामगिरी पाहिली तर भारत, पाकिस्तान या मोठ्या संघासाठी आव्हानात्मक ठरू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साधा सुधा नाय विश्वचषकातील दुसरा लांब षटकार हाय, ओडियन स्मिथच्या जबरदस्त शॉटने वेधले सर्वांचे लक्ष
मुख्य फेरीचे अखेरचे तिकीट झिम्बाब्वेकडे! स्कॉटलंडला नमवत केली ऐतिहासिक कामगिरी