टी20 विश्वचषकात रविवारी (23 ऑक्टोबर) मोठा सामना खेळला जाणार आहे. हा महामुकाबला असणार आहे भारत-पाकिस्तान या पांरपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात पाऊस चाहत्यांना उदास करणार का नाही हे तेथील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. रविवारी थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे सामना पूर्णपणे प्रत्येकी 20-20 षटकांचा खेळला जाणार आहे. तर यामध्ये आपण जाणून घेऊ खेळपट्टीचा रिपोर्ट.
भारत-पाकिस्तान यांनी खेळलेले मागील तिन्ही सामने दुबईच्या खेळपट्टीवर पार पडले. या सामन्यात नाणेफेक महत्वाची ठरली होती आणि सर्व सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले होते. तसाच काहीसा निकाल मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाहायला मिळाला आहे. येथे खेळण्यात आलेल्या मागील पाच आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणारा संघच जिंकला आहे. तसेच इएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, या मैदानावर 2020 पासून जेवढे टी20 सामने खेळले गेले त्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकण्याची टक्केवारी 50 राहिली.
भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर चार टी20 सामने खेळले आहेत. हे चारही सामने भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेले. यातील दोन सामन्यात भारताने विजय मिळवलेला आहे. एक सामना भारताने 27 धावांनी तर एक सामना 8 विकेट्सने जिंकले होते. तसेच एका सामन्यात पराभव संघाला पत्करावा लागलेला. अन्य एका सामन्याचा निकाल लागला नाही.
या मैदानावर 15 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेलेत. या सर्व सामन्यात ऑस्ट्रेलिया सहभागी झालेला. यावर्षी विश्वचषकात या मैदानावर सात सामने खेळले जातील. यामध्ये अंतिम सामन्याचा देखील समावेश आहे. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्या व्यतिरिक्त पात्रता फेरीतून पुढे येणाऱ्या संघाविरुद्ध देखील याच मैदानावर सामना खेळेल. एमसीजी हे जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मानले जाते. या मैदानाची आसन क्षमता एक लाखांपेक्षा जास्त आहे. 1992 वनडे विश्वचषक व 2015 वनडे विश्वचषकाचे अंतिम सामने देखील याच मैदानावर खेळले गेले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान वेगळाचं! भारतावर पडलायं भारी, एकदा आकडेवारी पाहाच
टी-20 क्रिकेटमध्ये 12 चेंडूत अर्धशतक करणारे फलंदाज, युवराजचे नाव पहिल्या क्रमांकावर