---Advertisement---

दुसऱ्या उपांत्य सामन्यात नशीब आजमावणार पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया? अशी असेल प्लेइंग इलेव्हन

On: गुरूवार, नोव्हेंबर 11, 2021 7:02 PM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुसऱ्या उपांत्य फेरीत गट ब मधील अव्वल संघ पाकिस्तान व गट अ मधील द्वितीय संघ ऑस्ट्रेलिया आमने-सामने येणार आहेत. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला पाकिस्तान संघ आपली तिसरी तर, ऑस्ट्रेलिया आपली दुसरी टी२० विश्वचषक अंतिम फेरी खेळण्याचा प्रयत्न करेल. हा सामना दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल. या सामन्यातील विजेता संघ १४ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळेल.

अजिंक्य आहे पाकिस्तान संघ
संपूर्ण विश्वचषकातील एकमेव अजिंक्य संघ म्हणून पाकिस्तान संघ ओळखला जात आहे. सुपर १२ फेरीत आपले पाचही सामने जिंकत त्यांनी दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी प्रत्येक सामन्यात संघाला दमदार सलामी दिली आहे. अनुभवी फखर झमान, मोहम्मद हफिज व शोएब मलिक यांनी मधली फळी सांभाळली असून, आसिफ अली याने फिनिशरची भूमिका चोख बजावली. गोलंदाजीची शाहिन आफ्रिदी, हारिस रौफ व हसन अली या त्रिकुटाला शादाब खान फिरकीपटू म्हणून योग्य साथ देताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत जाण्याचा प्रयत्न
सरस नेट रनरेटच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत जागा पटकावली आहे. संघासाठी अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व कर्णधार ऍरॉन फिंच यांनी आक्रमक सुरुवात करून दिली असून, मिचेल मार्श व मार्कस स्टॉमनिस हे त्यांना सहाय्य करत आहेत. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हेजलवूड ही वेगवान तिकडी विरोधी संघांना रोखण्यात यशस्वी ठरली आहे. लेगस्पिनर ऍडम झंपा हा स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असून, त्याला अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल साथ देताना दिसतो.

उपांत्य सामन्यासाठी उभय संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन-

पाकिस्तान-
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमान, मोहम्मद हफिज, शोएब मलिक, असिफ अली, इमाद वासिम, शादाब खान, शाहिन आफ्रिदी, हारिस रौफ व हसन अली.

ऑस्ट्रेलिया-

ऍरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड व ऍडम झंपा.

महत्त्वाच्या बातम्या- 

जेव्हा शाहीन आफ्रिदीने लाईव्ह सामन्यात विराट, रोहित, केएल राहुलची उडवली होती खिल्ली, पाहा व्हिडिओ

ज्या मुंबईतून क्रिकेटचे संस्कार झाले, त्याच मुंबई संघाचा ‘महागुरु’ बनलेल्या अमोल मुजुमदारचा प्रवास

अभय शर्मांना मागे टाकत ‘हे’ बनले भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाचे प्रमुख दावेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---