Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आजूबाजूला गोष्टी कितीही वेगाने घडूद्या…’, जोस बटलरने उपांत्य सामन्यापूर्वा केले रोहितचे कौतुक

'आजूबाजूला गोष्टी कितीही वेगाने घडूद्या...', जोस बटलरने उपांत्य सामन्यापूर्वा केले रोहितचे कौतुक

November 8, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Jos-Buttler

Photo Courtesy: Twitter/@englandcricket


भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाच जबरदस्त प्रदर्शन करत आहे, तर दुसरीकडे जोस बटलर याच्या नेतृत्वातील इंग्लंड देखील कुठे कमी पडताना दिसत नाही. उभय संघांतील हा सामना एडिलेड ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी जोस बटलरने विरोधी संघाचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे. 

जोस बटलर (Jos Buttler) याच्या मते रोहित शर्मा (Rohit sharma) एक चांगला फलंदाज आणि चांगला कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलध्ये मागच्या हंगामात बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी धुमाकेदार प्रदर्शन केले होते. पण त्याची आयपीएल कारकिर्दीची सुरुवात रोहित शर्माच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्ससाठी खेळू केली होती. अशात त्याला रोहितच्या नेतृत्वात खेळण्याचा अनुभव देखील आहे. भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी तो माध्यमांशी बोलत होता.

यावेळी बटलर म्हणाला, “तो (भारत) एक चांगला संघ आहे आणि रोहित शर्मा एक चांगला कर्णधार आहे. मला वाटते रोहितने खेळाडूंनी सकारात्मकेसह आणि मोकळेपणाने खेळायला सांगितले आहे. मी त्या (मुंबई इंडियन्स) आयपीएल जर्सीमध्ये थोडा लहान आहे. पण मला वाटते तो खूप उत्कृष्ट होता. चांगले निर्णय घ्यायचा, पण ते नेहमीच स्पष्ट नसायचे. जेव्हा त्याच्या आजू बाजूच्या गोष्टी सहा लाग किलोमीटरच्या ताशी गतीने चालू असतात, तेव्हाही तो शांत असतो. जेव्हा तो फलंदाजी करतो, तेव्हा तो सहजतेने खेळत असल्याचे पाहायला मिळते.”

दरम्यान, भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्वात या विश्वचषक स्पर्धेत पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे इंग्लंडने पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. ग्रुप एकमधून इंग्लंडसह न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला असून ग्रुप दोनमध्ये भारतासह पाकिस्तान उपांत्य फेरीत खेळेल. भारता आणि इंग्लंडचा सामना गुरुवारी, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा सामना बुधवारी (9 नोव्हेंबर) पार पडेल. स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर म्हणजेच रविवारी खेळला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘असं’ झालं, तर भारत- न्यूझीलंड संघात रंगणार टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना, आयसीसीचा नियम घ्या जाणून
टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे ‘बॉस’ लावणार हजेरी, गांगुलीचाही असू शकतो समावेश 


Next Post
Wasim Akram

VIDEO: पाकिस्तानी अँकरने ओलांडली हद्द, लाईव्ह शोमध्ये वसीम अक्रमला म्हटले 'नॅशनल धोबी'

Team-India

VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी शेयर केली 'ही' खास पोस्ट

Sandeep-Warrier-And-Devdutt-Padikkal

दुर्दैवच अन् काय! 2021मध्ये पदार्पण करणाऱ्या 'या' 5 खेळाडूंना विसरले राहुल द्रविड, ढुंकूनही नाही बघत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143