---Advertisement---

पाकिस्तानच्या उपांत्य सामन्यासाठीच्या आशा कायम! दक्षिण आफ्रिकेला 33 धावांनी चारली धूळ

pakistan team
---Advertisement---

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आमना सामना झाला. पाकिस्तान संघासाठी हा सामना जिंकणे दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत अधिक महत्वाचे होते. महत्वाच्या लढतील पाकिस्तानने 33 धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य सामन्याच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले. पाकिस्तानच्या विजयात इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांनी महत्वपूर्ण खेळी केली. 

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या फलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये झटपट विकेट्स गमावल्या. पण नंतर इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) याने 51, तर शादाब खान (Shadab Khan) याने 52 धावांचे सर्वात मोठे योगदान दिले. पाकिस्तानने मर्यादित 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 185 धावा कुटल्या. परंतु प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका हे लक्ष्य गाठू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एंगिडी (Lungi Ngidi) याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. लक्ष्याच पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. पाकिस्तानसाठी गोलंदाजांमध्ये शाहीन आफ्रिदी याने सर्वोत्तम प्रदर्शन करत तीन विकेट्स नावावर केल्या.

पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली. 186 धावांचा पाढलाग करताना दक्षिण आफ्रिका 9 विकेट्सच्या नुकसानावर 108 धावांपर्यंत मजल मारू शकला. आफ्रिकी संघाचा कर्णधार टेंबा बवुमा () सलामीसाठी आला आणि संघासाठी त्यानेच सर्वात मोठी खेळी केली. बावुमाने 19 चेंडूत 36 धावा केल्या. तर दुसरीकडे ऍडन मार्करम 20 धावा करून संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने या सामन्यात टाकलेल्या तीन षटकांमध्ये 14 धावा खर्च केल्या आणि संघासाठी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. शादाब खानने 2 षटकांमध्ये 16 दावा 2 विकेट्स नावावर केल्या.

या सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर पाकिस्तान संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांना आता विश्वचषकातील पुढचा सामना बांगलादेशसोबत खेळायचा आहे. बांगलादेशविरुद्धही संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. कारण पुढच्या संगामन्यात जर संघ पराभूत जाला, तर संघ उपांत्य सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाला पुढच्या सामन्यात नेदरलँड्सचे आव्हान असेल. पाकिस्तानला जर उपांत्य सामना गाठायचा असेल, तर दक्षिण आफ्रिका संघ नेदरलँड्सकडून पराभूत झाला पाहिजे, जे सध्या तरी खूपच कठीण दिसत आहे. भारतीय संघ ग्रुप दोनच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे आणि संघाने उपांत्य सामन्यातील जागा जवळपास पक्की केली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 22 वर्षांच्या वयात आफ्रिदी गाजला, आफ्रिकेच्या धुरंधरांना तंबूत धाडताच केला खास विक्रम
‘बांगलादेशचे फलंदाज घाबरले’, भारताच्या विजयानंतर असे का म्हणाले गावसकर? घ्या जाणून  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---