आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय संघ ब्रिसबेनमध्ये पोहोचला आहे. 23 ऑक्टोबर रोजी भारताला विश्वचषक अभियानाची सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी संघाला दोन सराव सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सराव सामने ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. संघाला पहिला सराव सामना 17 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे, तर दुसरा सामना 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडसोबत खेळायचा आहे. बीसीसीआय एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात सर्व भारतीय खेळाडू पर्थवरून ब्रिसबेनसाठी रवाना होत आहेत.
भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियाक खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत भारताचा संपूर्ण संघ पर्थवरून ब्रिसबेनसाठी रवाना होताना दिसत आहे. यादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अक्षर पटेल मोठमोठ्या हसताना दिसतात. तर अष्टपैलू हार्दिक पंड्या कॅमेरामध्ये संघ कुठे चालला आहे, ते सांगतो. त्याव्यतिरिक्त इतर खेळाडूही या व्हिडिओत दिसले. रिषभ पंत चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसला, तर सूर्यकुमार हॅटेलकडे जात असत्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषकापूर्वी झालेल्या फोटोशूट आणि माध्यमांशी चर्चा करण्यासाठी मेलबर्नला पोहोचला होता. त्याठिकाणी त्याने इतर सर्व कर्णधारांसोबत कार्यक्रमात भाग घेतला. आता भारतीय संघ ब्रिसबेनमध्ये पोहोचला आहे.
Touchdown Brisbane 📍#TeamIndia pic.twitter.com/HHof4Le3mP
— BCCI (@BCCI) October 15, 2022
टी-20 विश्वचषक दोन ग्रुपमध्ये खेळला जाणार आहे. भारताच्या ग्रुपमध्ये दक्षिण आप्रिका, बांगलादेश आणि एक संघ पहिली फेरी खेळल्यानंतर निश्चित होईल. पहिल्या फेरीचे सामने 16 ते 21 ऑक्टोबरपर्यंत खेळले जातील. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 फेरी सुरू होईल, ज्याचा पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि प्रतिस्पर्धी न्यूझीलंडमध्ये खेळला जाईल. भारत आधीपासून सुपूर 12 मध्ये सहभागी असल्यामुळे संघ पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत खेळेल. त्यानंतर भारताला 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकासोबत सामना खेळायचा आहे. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी भारत आणि बांगलादेश आमने सामने असतील. यादरम्यान भारतीय संघ 27 ऑक्टोबर आणि 6 नोव्हेंबरला देखील सामने खेळणार आहे, पण या सामन्यात भारतापुढे कोणाचे आव्हान असेल हे निश्चित झाले नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी: नवीनचा झंझावात कायम! दिल्लीचा विजयी चौकार; जयपूर-बंगालचे शानदार विजय
आता हे काय मध्येच! वॉर्नर भारताविरुद्धच्या सामन्यातून होणार बाहेर? पण कॅप्टनला नाही कसलीच चिंता