रविवारी (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानला 5 विकेट्सने मात देत इंग्लंड विश्वचषक विजेता बनला. टी-20 विश्वचषक 2022 चा हा अंतिम सामना होता, जो पाकिस्तानने गमावला. पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. 20 षटकांमध्ये त्यांनी 8 विकेट्सच्या नुकसानावर 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लडने हे लेक्ष्य 19 षटकांमध्ये गाठले. पाकिस्तानच्या पराभवाचे सर्वात महत्वाचे कारण ठरले, ते म्हणजे वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला झालेली दुखापत.
दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) या सामन्यात स्वतःचे चार षटके टाकू शकला नाही. त्याने टाकलेल्या 2.1 षटकात 13 धावा देत 1 विकेट घेतली होती. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज ऍलेक्स हेल्स (Alex Hales) आफ्रिदीने टाकलेल्या पहिल्याच षटकात एक धाव करून बाद झाला. डावातील तिसऱ्या षटकात आफ्रिदीने त्याचे दुसरे षटक टाकले. स्वतःच्या कोट्यातील तिसरे षटक टाकण्यासाठी आफ्रिदी थेट 16 व्या षटकात पुढे आला आणि यावेळी संघाला त्याच्या भेदक गोलंदाजीची गरज देखील होती. परंतु तितक्यात त्याला दुखापतमुळे मैदान सोडावे लागले.
इंग्लंडच्या डावातील 16 व्या षटकात शाहीन आफ्रिदी गोलंदाजीसाठी आला होता. त्याने या षटकात पहिला चेंडू टाकला आणि त्याला वेदाना होत असल्याचे पाहायला मिळाले. वेदनेमुळे आफ्रिदी षटकातील पुढचे चेंडूही टाकू शकला नाही आणि मैदानाबाहेर जाऊन बसला. त्याचे हे षटक पुढे इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) याने पूर्ण केले. आफ्रिदीने या षटकातील पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नव्हती. पण पुढच्या पाच चेंडूंवर इफ्तिखार अहमदने 13 धावा खर्च केल्या. पाकिस्तानसाठी आफ्रिदी त्याचे शेवटचे 11 चेंडू टाकू शकला नाही, जे संघाला खूपच महागात पडले.
''Shaheen Afridi'' you have no idea that how much we love you 🥺#ShaheenShahAfridi #PakvsEng2022 #T20WorldCupFinal pic.twitter.com/v6xOj1rUko
— Srk Warrior𓀠 (@SRKsAhSOO) November 13, 2022
इंग्लंडचा मध्यक्रमातील फलंदाज 13 व्या षटकात झेलबाद झाला. त्याने शादाब खान गोलंदाजी करत असताना शाहीन आफ्रिदीच्या हातात विकेट गमावली. पण यादरम्यान आफ्रिदीच्या पायाला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. दुखापतीनंतर आफ्रिदी जास्त वेळ मैदानात खेळू शकला नाही. झेल घेताना झालेल्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता आली नाही, ज्याचा फायदा थेट इंग्लंडच्या फलंदाजांनी उचलला. इंग्लंड एक षटक राखुन अंतिम सामन्यात विजय मिळवला. ही दुसरी वेळ आहे, जेव्हा इंग्लड टी-20 विश्वचषकाचा विजेता संघ बनला आहे. यापूर्वी 2010 मध्ये इंग्लंडने त्यांचा पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आतापर्यंत ‘या’ संघांनी उंचावलीय टी20 वर्ल्डकपची ट्रॉफी, विजेत्यांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर
बाबरच्या बॅटमध्ये दम नाही! आशिया चषक आणि टी20 विश्वचषकात ‘एवढं’ सोपं काम करण्यात अपयशी