खेळाडूंच्या जिवनावर येणारे चित्रपट ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. आत्तापर्यंत अनेक स्टार खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात आले आहेत. यात मिल्खासिंग, मेरी कोम, एमएस धोनी, फोगट भगिनी, अशा अनेक खेळाडूंवरील चरित्रपटांचा समावेश आहे. आता यात आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. भारताची दिग्गज महिला फलंदाज मिताली राजच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात मितालीची भूमीका अभिनेत्री तापसी पन्नू साकारणार आहे. या चित्रपटासाठी तापसीने क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासही सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे नाव ठरले आहे. हा चिरित्रपट ‘शाब्बास मिथू’ या नावाने प्रदर्शित होईल.
नुकतेच तापसी पन्नूने तिच्या क्रिकेट प्रशिक्षणादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात ती हातात बॅट घेऊन फलंदाजी करण्याच्या तयारीत दिसत आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की “…आणि बॅट आणि बॉलमधील रोमान्सला सुरुवात झाली आहे. अजून दूरचा प्रवास करायचा आहे; पण चांगली सुरुवात हे आर्धे काम पूर्ण झाल्यासारखेच असते. हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरणार आहे. हे आपल्या ‘कॅप्टनकूल’ मिताली राज आणि तिच्या भारतीय संघासाठी आहे.’
And romance with the bat n the ball has begun….
long way to go but a good start is half job done 🙂
This is going to be another milestone of sorts….
For our captain cool @M_Raj03 and all her #WomenInBlue 🏏 🇮🇳 #ShabaashMithu @rahuldholakia @AndhareAjit @Viacom18Studios pic.twitter.com/8ZK5yNfGZK— taapsee pannu (@taapsee) January 27, 2021
मितालीच्या वाढदिवसाच्या दिवशी झाली चित्रपटाची घोषणा –
सन 2019 ला 3 डिसेंबर रोजी मितालीच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर चरित्रपट होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी तापसीने सोशल मीडियावर मितालीबरोबर केक कापतानाचा फोटो शेअर करताना चाहत्यांना ती मितालीची भूमिका निभावणार असल्याची खूशखबरी दिली होती.
मितालीबद्दल थोडक्यात…
3 डिसेंबर 1982 रोजी जन्मलेली मिताली भारतीय महिला वनडे क्रिकेट संघाची कर्णधार आहे. तसेच ती महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
जोधपूरमध्ये जन्मलेल्या मितालीने जून 1999 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन दशकांहून अधिक काळ व्यतीत करूनही ती अजूनही सक्रिय आहे.
तिने आत्तापर्यंत 209 वनडे सामन्यांमध्ये 6888 धावा केल्या आहेत. तसेच तिने 10 कसोटी सामन्यांत 663 धावा केल्या आहेत आणि 89 टी20 सामन्यांत तिने 2364 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आर्चर म्हणतो, “भारतीय फिरकीपटूंनी आम्हाला हरवण कठीण, स्पिनर्सची आमच्याकडेही भरमार”
आरसीबीने संघातून सोडल्यानंतर ‘या’ खेळाडूची सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चौकार-षटकारांची आतीषबाजी