वनडे मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघांमध्ये टी-२० मालिकेला प्रारंभ झाला आहे. ४ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकन संघावर ४ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघाचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी याच्याकडून आगळ्या वेगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन पाहायला मिळाले आहे. ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तान संघ फलंदाजी करत असताना असा काही प्रकार घडला, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. दक्षिण आफ्रिकन संघाचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी हा आपल्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहे. त्याने पाकिस्तान संघाच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी ‘शूज सेलिब्रेशन’ केल्याचे पाहायला मिळाले आहे. तो आपला पायातला शूज काढून फोन कॉल करताना दिसून आला आहे.
या सेलिब्रेशन नंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. एका युजरने त्याचा हा सेलिब्रेशन करत असतानाचा फोटो ट्विट करत लिहिले की, “सुन रही हो ना तुम.. रो रहा हूं मै.”
Sun raahi hai na tu…….
Rooo raha hooon mein …… ????#PAKvsSA pic.twitter.com/anxrlWq1bd— KUCH ALFAZ???? (@kuch_alfazz) April 10, 2021
तसेच दुसऱ्या युजरने ट्रोल करत लिहिले की, “पप्पा आम्ही पुन्हा पराभूत झालो आहोत.” या फोटोमध्ये तो शूजने फोन कॉल करत असल्यासारखे दिसून येत आहे त्यामुळे या युजरने अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Papa hum phir haar gye????????#PAKvsSA pic.twitter.com/lvO20ezjNB
— Bobbzy????????✌️ (@official_toqeer) April 10, 2021
दक्षिण आफ्रिकन संघाने दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करताना, पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवान याने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. यात त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावले होते. यासोबतच बाबर आजम याने १४, फखर जमानने २७ आणि मोहम्मद हफिज १३, अशरफ याने ३० धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. हा सामना पाकिस्तान संघाने ४ गडी राखून जिंकला. यासोबतच मालिकेत १-० ने आघाडी देखील घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! ग्लेन मॅक्सवेलला लिलावापूर्वीच देण्यात आली होती आरसीबीची कॅप; विराटचा गौप्यस्फोट
CSKvDC: खराब क्षेत्ररक्षण ते विकेट्सची कमी, ‘ही’ आहेत चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाची कारणे
सपशेल फ्लॉप ते सुपरहिट! सीएसकेला चोप चोप चोपणाऱ्या पृथ्वी शॉला कसा गवसला सूर? वाचा




