Pep Guardiola
‘इस वारी वी टाइटल लै के जाणा है’, विराटकडून मँचेस्टर सिटीच्या मॅनेजरचं पंजाबी स्टाईलमध्ये कौतुक
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) फुटबॉलप्रेमी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मँचेस्टर युनाइटेड (Manchester United) कडून खेळणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) त्याचा....
फुटबॉलच्या नियमांमध्ये मोठे बदल; प्रशिक्षकांची होणार पंचाईत
आता फुटबॉलच्या सामन्यांमध्ये संघाच्या खेळांडूबरोबर प्रशिक्षकानांही यलो आणि रेड कार्ड मिळतील. इंग्लंडमधील चार मोठ्या स्पर्धांमध्ये या नियमांचा वापर केला जाणार आहे. आतंरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने हे....
मॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद
ओल्ड ट्रेफोर्ड| काल झालेल्या सामन्यात वेस्ट ब्रोमविच अलबिऑनने मॅनचेस्टर युनायटेडचा पराभव केला. ओल्ड ट्रेफोर्ड येथे झालेल्या या पराभवामुळे मॅनचेस्टर युनायटेडला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. याचमुळे मॅनचेस्टर....
Carabao Cup: मॅन्चेस्टर सिटीचे मौसमातील पहिले विजेतेपद
एफए कपच्या सामन्यात झालेला पराभव आणि त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडायची नामुष्की आलेल्या प्रिमियर लीगच्या विजेतेपदावर आपले नाव कोरण्यापासून अवघे काही पाऊल दूर असलेल्या मॅन्चेस्टर सिटीने....
Premier League: मॅन्चेस्टर सिटीचे वर्चस्व कायम, विजेतेपदाची दावेदारी केली आणखी भक्कम
प्रिमियर लीग जशी जशी पुढे सरकते आहे तसे या वर्षी कोणता संघ विजेतेपद पटकवणार ते स्पष्ट होत आहे. लीगच्या पहिल्या सामन्यापासूनच आपले वर्चस्व सिद्ध करणाऱ्या....
मॅन्चेस्टर सिटीचा विजयी रथ क्रिस्टल पॅलेसने रोखला.
मॅन्चेस्टर सिटीचा विजयी रथ क्रिस्टल पॅलेसने रोखत सर्वांना एक धक्का दिला. १९ वा विजय नोंदवून नवा विक्रम प्रस्थापित करतील अशी सगळ्यांना आशा असतानाच त्यांचा क्रिस्टल....
Premier League: मॅन्चेस्टर सिटीची प्रिमियर लीगमधील स्वप्नवत सफर
प्रिमियर लीग मध्ये आज प्रत्येक संघाला धाक बसलाय तो मॅन्चेस्टर सिटीचा असे आपण कालच्या सामन्यानंतर नक्कीच बोलू शकतो. लीगचे प्रत्येक संघाचे १९ सामने झालेत आणि लीग बरोबर अर्धी संपली असतानाच विजेता संघ जवळजवळ स्पष्ट झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. १९ सामन्यात १८ सामने जिंकत ५५ गुणांसह पेप गार्डिओलाची मॅन्चेस्टर सिटी पहिल्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या स्थानावरील मॅन्चेस्टर युनाएटेडपेक्षा थोडेथोडके नाही तर तब्बल १३ गुणांच्या फरकाने घेतलेली ही आघाडी सिटीला नक्कीच या वर्षीच्या प्रिमियर लीगवर आपले नाव कोरण्यास मदत करेल. काल झालेल्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर बाॅर्नेमाॅथचा ४-० ने पराभव करत सिटीने सलग १७ वा विजय नोंदवला. मागील ८ महिन्यात सिटीने एक पण प्रिमियर लीगचा सामना गमावला नाही. काल सिटी तर्फे ॲगुवारोने २ तर डॅनिलो आणिस्टर्लिंगने प्रत्येकी १-१ गोल नोंदवला. ॲगुवारो आणि स्टर्लिंगने प्रत्येकी १-२ गोलला असिस्ट सुद्धा केले. पहिल्या हाफ मध्ये २७ व्या मिनिटला बाॅर्नेमाॅथच्या गोलकिपरच्या चुकीमुळे सिटीने बाॅलवर ताबा मिळवला आणि फर्नडिन्होच्यापासवर ॲगुवारोने हेडर मारत सिटी साठी पहिला गोल केला. हा ॲगुवारोचा सिटीच्या घरच्या मैदानावर १०० वा गोल होता. सिटीसाठी ७९ व्या मिनिटला तिसरा आणि ॲगुवारोचा दूसरा गोल पण हेडरच होता. प्रिमियर लीगच्या एकाच सामन्यात हेडरने दोनगोल करायची ॲगुवारोची ही पहिलीच वेळ होती. या मौसमातील ११ मधुन ७ गोल्स शेवटच्या १० मिनिटात करणार्या स्टर्लिंगने सामन्याच्या ५३ व्या मिनिटला ॲगुवारोच्यापासला उजव्या कोपर्यातुन मारत सिटीचा दूसरा आणि आपला १२ वा गोल केला. शेवटच्या मिनिटात गोल साठी प्रसिद्ध झालेल्या स्टर्लिंगने बाॅल आपल्या ताब्यात घेत बदली खेळाडू म्हणुन आलेल्या डिफेंडर डॅनिलोकडे दिला आणि त्याने त्याचे गोल मध्ये रुपांतर करत सिटी साठी आपला पहिला गोल नोंदवला तर स्टर्लिंगने आपल्या नावे एक असिस्ट नोंदवला. # सिटीने २०१७ वर्षात १००+ गोल्स करत १९८२ च्या लीवरपुलच्या १०६ गोल्स नंतर असा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला. # या मौसमात युरोपच्या टाॅप ५ लीग मध्ये अपराजित राहणार्या २ संघांमधून मॅन्चेस्टर सिटी हा १ संघ आहे. # युरोपच्या टाॅप ५ लीगमध्ये सर्वाधिक सामने लागोपाठ जिंकायच्या यादीत सिटी १७ विजयासह दूसर्या स्थानावर आहे तर२०१३-१४ च्या १९ विजयासह बायर्न म्युनिच पहिल्या स्थानी आहे. विशेष म्हणजे तेव्हा पण बायर्नचा मॅनेजर पेप गार्डिओलाच होता. # आपल्या घरच्या मैदानावर या वर्षी सिटीने एक पण सामना गमावला नाही. झालेल्या २६ सामन्यात २१ विजय तर ५ सामने बरोबरीत सुटले.
मॅन्चेस्टर डार्बी मध्ये सिटीचा दबदबा कायम, युनायटेडचा २-१ ने पराभव
काल झालेल्या मॅन्चेस्टर डार्बी मध्ये सिटीने १-२ असा युनाएटेडचा धुव्वा उडवला. या विजयासह सिटीने गुणतालीकेत ११ गुणांची भव्य आघाडी घेतली आहे. १६ सामन्यात १५ विजयांसह....
मँचेस्टर सिटीने उडवला स्टोक सिटीचा धुव्वा!!
इंग्लीश प्रीमीयर लीग दिवसेंदिवस आपल्या अनपेक्षित निकाल आणि विजेतेपदासाठी असलेल्या चढाओढीमुळे अधिकच रोचक होते आहे. मँचेस्टर सिटीने काल जिंकत आपली दावेदारी अधिक मजबूत केली तर....






