---Advertisement---

पायातील बूट स्टंपला लागल्याने खेळाडू झाला अजबच पद्धतीने बाद, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

बांगलादेश आणि श्रीलंका दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 209 धावांनी पराभव केला. हा सामना मैदानावर झालेल्या खेळासोबतच आणखी एका मजेशीर प्रसंगामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात प्रसिद्ध झाला आहे. सामन्यादरम्यान बांगलादेशचा फलंदाज तायजुल इस्लाम फलंदाची करताना पायातील बूट स्टंपला लागल्यामुळे विनोदी पद्धतीने बाद झाला. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

बांगलादेशचा संघ आपल्या पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 82 व्या षटकात सुरंगा लकमल गोलंदाजीसाठी आला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इस्लाम स्ट्राइक वर होता. यावेळी चेंडू खेळताना इस्लामच्या पायातील बूट निसटून स्टम्पला लागला व तो विचित्र पद्धतीने हिट विकेट झाला. क्रिकेटमध्ये कदाचित अशा पद्धतीने बाद होण्याची ही पहिलीच घटना असावी, त्यामुळे अर्थातच संपूर्ण क्रिकेट विश्वात या प्रसंगाबद्दल मजेशीर प्रतिक्रिया उमटत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=c4BRSWGNhOc

दरम्यान सामन्याचा विचार केला असता, श्रीलंकेने बांगलादेशला चारी मुंड्या चीत केले. प्रथम फलंदाजी करत असलेल्या श्रीलंकेने आपल्या पहिल्या डावात 7 बाद 493 धावा केल्या. श्रीलंकेकडून पहिल्या डावात कर्णधार दिमुथ करुणारत्ने (118) व लाहिरू थिरीमाने (140) यांनी शतकीय खेळी केली. बांगलादेशकडून तस्कीन अहमदने 4 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव केवळ 251 धावांवर आटोपला. बांगलादेश कडून तमिम इक्बालने 91 धावांची एकाकी झुंज दिली. श्रीलंकेकडून प्रवीण जयविक्रमाने 6 गडी बाद केले. यानंतर श्रीलंकेने आपला दुसरा डाव 9 बाद 194 धावांवर घोषित केला व बांगलादेशला 437 धावांचे अशक्यप्राय लक्ष दिले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा दुसरा डावही प्रीवण जयाविक्रमा आणि रमेश मेंडिस त्याच्या भेदक माऱ्यासमोर 227 धावांत आटोपला व श्रीलंकेने 209 धावांनी सहज विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2021 : बाद फेरीत स्थान मिळवण्याची चुरस वाढली, पाहा कोणते संघ पक्की करणार आपली जागा

एका धावेने शतक हुकले, पण मयंकच्या नावे झाला हा कीर्तिमान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---