आशियाई गेम्स 2023 मध्ये भारतीय संघाचे खेळाडू चमकदार कामगिरी केली. रविवारी (1 ऑक्टोबर) भारतने आशियाई गेम्सच्या 19व्या हंगामातील 13 वे सुवर्णपदक जिंकले. गोळाफेक स्पर्धेत तजिंदरपाल सिंग याने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर ही संख्या 13 पर्यंत पोहोचली. त्याआधी रविवारीच 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये भारताच्या अविनाश साबळे याने सुवर्ण पदक जिंकले.
रविवारी (1 ऑक्टोबर) आशियाई गेम्समध्ये तजिंदरपाल सिंग तूर (Tajinderpal Singh Toor) याने सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारताची पदकसंख्या 44 पर्यंत पोहोचली. तजिंदरपाल सिंग तूर याच्यासाठी आशियाई गेम्समध्ये हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी 2018 मध्ये जकार्ता आशियाई गेम्समध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
???? GOLD MEDAL ALERT ???? ????
44th Medal for India ????
Shotput FINAL
Tajinderpal Singh Toor first with the massive throw of 20.36#AsianGames2022 #IndiaAtAsianGames pic.twitter.com/fqgCo2OzMm— The Khel India (@TheKhelIndia) October 1, 2023
???? Avinash Sable – GOLD ????????
Medal No.44th for India ????
Win with a big lead, Champion Avinash ????????#AsianGames2022 #IndiaAtAsianGames pic.twitter.com/IpE7JjeE0b
— The Khel India (@TheKhelIndia) October 1, 2023
3000 मीटर स्टीपलचेसमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अविनाश साबळे (Avinash Sable) यानेही इतिहास रचला आहे. आशियाई गेम्सच्या चालू हंगामात ऍथलेटिक्समध्ये भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. त्याने 8:19:53 मिनिटांमध्ये हा विक्रम केला. बॉक्सिंगमध्येही भारताला सुवर्णपदक मिळण्याच्या अपेक्षा होत्या. मात्र रविवारी या अपेक्षा संपल्या, उपांत्य सामन्यात भारताची महिला बॉक्सर मिखत जरीन पराभूत झाली. तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. (Tajinderpal Singh Toor Avinash Sable won GOLD MEDAL in Aisan Games 2023)
महत्वाच्या बातम्या –
रोहितचा चाहता बनला पाकिस्ताचा 24 वर्षीय अष्टपैलू, विश्वचषकापूर्वी केलं तोंड भरून कौतुक
VIDEO: हॉकीच्या मैदानावर क्रिकेटपटूंनी वाढवला हौसला! हरमन सेनेने चिरडले पाकिस्तानचे आव्हान