ऑस्ट्रेलियाचे महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात्तम गोलंदाजांपैकी एक मानले जातात. निवृत्तीनंतर देखील त्यांनी क्रिकेटचे मैदान सोडले नाही. सध्या ते भारतीय युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करत आहेत. एमआरएफ पेस फाउंडेशनचे ते डायरेक्टर आहेत. त्यांच्या मते आगामी काळात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीची भूमिका भारतीय संघासाठी महत्वाची असेल.
ग्लेन मॅकग्रा (Glenn MacGrath) यांच्या मते विराटने काही काळ विश्रांती घेतली, तर तो योग्य निर्णय असेल. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “क्रिकेट आत्मविश्वासाचा खेळ आहे आणि कोहली असाच खेळाडू आहे. जेव्हा तो लयीत असतो, तेव्हा एकापाठोपाठ एक धाव करतो. सध्या गोष्टी त्याच्यासाठी योग्य होत नाही आहेत. अशात हे (क्रिकेट) त्याच्यासाठी एक अवघड ठिकाण आहे. ब्रेक घेणे त्याच्यासाठी चांगले असेल. मी हे पाहण्यासाठी उत्सुक आहे की, तो कशा पद्धतीने पुनरागमन करतो. विश्वचषक येत आहे आणि भारतीय भारताला चांगल्या प्रदर्शनासाठी अनुभवी खेळाडूंची गरज आहे.”
उमरान मलिक (Umran Malik) सध्या त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी सर्वत्र चर्चेत आहे. त्याच्याविषयी बोलताना मॅकग्रा म्हणाले की, “वेगाने गोलंदाजी करणे खूप खास असते आणि गतीसोबत नियंत्र आणि स्थिरता आली, तर असा गोलंदाज खूप खतरनाक बनतो.”
उमरानच्या कसोटी पदार्पणाविषयी बोलताना मॅकग्रा म्हणाले की, “सध्या त्याच्याकडे वेळ आहे आणि सुरुवातीला त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करावे लागेल.” अजून ते उमरानशी भेटले नाहीत आणि एक व्यक्ती म्हणून तो कसा आहे, हे त्यांना माहिती नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, भारतीय दिग्गज विराट मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. विराटने मागच्या दोन ते अडीच वर्षांमध्ये एकही शतक केले नाहीये. याच पार्श्वभूमीवर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीक देखील होत आहे. दुसरीकडे असंख्य चाहते त्याच्या चांगल्या फलंदाजीची वाट पाहत आहेत. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात विराटची फलंदाजी संघाला विजयी मिळवून देईल, अशी अनेकांना अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कार्लोस ब्रेथवेटने फलंदाजाला मारलेला चेंडू संघाला पडला महागात, गमवावा लागला सामना
INDvsSA T20: पावसामुळे रद्द झालेल्या सामन्याच्या तिकिटाची रक्कम मिळणार परत, जाणून घ्या किती ते
बॅग पॅक करा आणि नव्या दौऱ्यावर निघा, ‘असे’ आहे टीम इंडियाचे पुढच्या ६ महिन्यांचे वेळापत्रक






