बऱ्याचदा लाईव्ह क्रिकेट सामन्यात खेळाडूंसोबत छोटे-मोठे अपघात घडताना दिसतात. कधी धाव घेताना फलंदाज आणि गोलंदाजाची एकमेकांशी धडक होते. कधी क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू गोलंदाजाला येऊन लागतो, इत्यादी. अशीच एक घटना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघातील तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान घडली आहे. झिम्बाब्वेचा सलामीवीर ताकुझवानशे कैतानो याने भारतीय गोलंदाज आवेश खान याच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. परंतु हा षटकार खेचणे त्याला महागात पडले आणि त्याला मैदान सोडावे लागले.
तर झाले असे की, भारताच्या भल्यामोठ्या २९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना (India vs Zimbabwe) झिम्बाब्वेकडून कैतानो आणि इनोसेंट काइया ही जोडी सलामीला फलंदाजीसाठी आली. परंतु संघाच्या अवघ्या ७ धावांवर झिम्बाब्वेला पहिला झटका बसला. काइया वैयक्तिक ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर कैतानोकडून संघाला मोठ्या धावांची अपेक्षा होती.
कैतानोने (Takudzwanashe Kaitano) सावध फलंदाजी करत असतानाच भारतीय गोलंदाज आवेशच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारला. त्याने आवेशच्या डावातील सहाव्या षटकातील सहाव्या चेंडूवर शॉर्ट बॉलवर पूल शॉट मारून षटकार मिळवला. परंतु हा षटकार खेचताना त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. यामुळे कैतानोला इतक्या वेदना झाल्या की, तो मैदानावरच लोळू लागला. यानंतर झिम्बाब्वे संघाचे फिजिओ त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले. यावेळी कैतानो १२ धावांवर खेळत होता.
त्यानंतर तो पुन्हा फलंदाजीला आला. परंतु अवघी १ धाव काढून कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर (२७.२ षटक) यष्टीरक्षक इशान किशनच्या हातून यष्टीचीत झाला.
Takudzwanashe Kaitano has retired hurt for 12. We wish him well.
FOLLOW LIVE:
👉 https://t.co/7tPk9nsvxu 👈#ZIMvIND | #INDvZIM pic.twitter.com/opja3mwLFW— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) August 22, 2022
एकाच सामन्यात दोघांनी मारली शतके
दरम्यान भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर २८९ धावा केल्या. या डावात भारताकडून सलामीवीर शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ९७ चेंडूत १ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १३० धावा केल्या. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक होते. त्याच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने झिम्बाब्वेपुढे २९० धावांचे आव्हान ठेवले.
प्रत्युत्तरात झिम्बाब्वेकडून सिकंदर रझानेही शानदार शतक झळकावले. त्याने ९५ चेंडूत ११५ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. परंतु ४९.३ षटकातच २७६ धावांवर झिम्बाब्वेचा संघ सर्वबाद झाला आणि त्यांनी १३ धावांनी सामना गमावला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: पुन्हा एकदा धोनीने दाखवंल औदार्य! चाहत्यांना दिल्या खास शुभेच्छा
ना बॉलचा, ना बॅटचा; हा प्रसंग आहे भावनेचा.. अखेरच्या वनडेत खिलाडूवृत्ती दाखवत चाहरने जिंकली मने
मानलं गड्या! छोट्याशा करिअरमध्येच अझरपासून रोहितपर्यंत सर्वांना गिलचा धोबीपछाड