Rohit Sharma Mohammad Nabi Controversy: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा फलंदाज मोहम्मद नबी यांच्यात सुपर ओव्हरमध्ये वाद झाला. हा वाद पहिल्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर नबीने काढलेल्या तीन धावांचा होता.
बुधवारी (17 जानेवारी) खेळल्या गेलेल्या टी20 सामन्याच्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा संघ फलंदाजी करत असताना, मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याने शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तो चुकला आणि चेंडू संजू सॅमसनकडे गेला. इकडे नबी धाव घेण्यासाठी धावला आणि संजूने थ्रो गोलंदाजाच्या दिशेने फेकला. हा थ्रो नबीच्या पायाला लागला आणि चेंडू दुसऱ्या बाजूला गेला. अशा स्थितीत नबीने आणखी दोन धावा काढल्या. म्हणजे जिथे एक धावही काढायला नको होती तिथे तीन धावा झाल्या. यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) इतका संतापला की त्याने नबीशी वाद घालण्यास सुरुवात केली.
रोहितच्या म्हणण्यानुसार, नबीच्या पायाला चेंडू लागल्याने त्याने धाव घेयला नव्हती पाहिजे. येथे काही क्षण दोघांमध्ये वादावादी होऊन प्रकरण संपले. मात्र, याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. क्रिकेट चाहते आपली मते व्यक्त करत आहेत. क्रिकेट तज्ज्ञ, माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेटपटूही या विषयावर आपली मते मांडत आहेत. यातच आर अश्विन यानेही यावर भाष्य केले आहे.
आर अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “या प्रकरणाला दोन बाजू आहेत. यामुळे आमचे नुकसान झाले असते तर आम्हाला वाईट वाटले असते. आम्ही म्हणतो की, आम्ही तिथे असतो तर आम्ही हे केले नसते. हे आमचे वैयक्तिक मत आणि दृष्टिकोन आहे. एक भारतीय क्रिकेट फॅन असल्याने मी असे म्हणू शकतो की, उद्या जर आपण विश्वचषक नॉक आऊट सामन्यात सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करत आहोत आणि एका चेंडूवर दोन धावा हव्या आहेत, तर यष्टीरक्षकाचा थ्रो आपल्याला लागला आणि चेंडू दुसरीकडे गेला तर आम्ही देखील धावा काढू. अशा परिस्थितीत खेळाडू का धावणार नाही?” (Talk of Nabi’s those 3 runs in Super Over now R Ashwin supports Afghanistan batsman)
हेही वाचा
‘मी सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही…’, रोहित शर्माचे टी20 विश्वचषक संघ निवडीबाबत मोठे विधान
AUS vs WI: पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिजचा 10 विकेट्सने धुव्वा, आरसीबीने सोडलेल्या गोलंदाजाने केला कहर